सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की जास्त चिकन आणि मटण खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. या दाव्याने अनेक लोकांमध्ये भीती पसरली आहे. पण या दाव्यात किती तथ्य आहे? यावर सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
चिकन आणि हृदयविकाराचा धोका: सत्य काय आहे?
प्रथिनांचा (प्रोटीन) उत्तम स्रोत म्हणून चिकन-मटण खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की जास्त प्रमाणात चिकन खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. व्हिडिओमध्ये प्रश्नमंजुषा दाखवली असून त्यात हृदयविकार, साखर, चेचक आणि कर्करोग यापैकी योग्य उत्तर निवडण्यास सांगितले आहे.
हिवाळ्यात कोणते ज्यूस पिणे शरीरासाठी ठरते फायदेशीर ?
तज्ज्ञांचे मत काय?
आयसीएमआर-एनआयएन, एमएससी अप्लाइड न्यूट्रिशन आणि विविध आहारतज्ज्ञांच्या मते, केवळ चिकन किंवा मटण खाल्ल्याने हृदयविकार होत नाही. मात्र, त्याची शिजवण्याची पद्धत महत्त्वाची आहे.मसालेदार आणि ट्रान्स फॅटयुक्त पदार्थ अति प्रमाणात तळलेले आणि मसालेदार चिकन खाल्ल्यास हृदयावर ताण येऊ शकतो. यामुळे कोलेस्टेरॉल वाढू शकते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
प्रसिद्ध मराठी कॉमेडियन प्रणित मोरेला बेदम मारहाण
फॅक्ट चेक
व्हायरल दावा चुकीचा आहे!
चिकन किंवा मटण खाल्ल्याने थेट हृदयविकाराचा झटका येत नाही.
तळलेले आणि जास्त मसालेदार पदार्थ टाळणे महत्त्वाचे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
काय करावे आणि काय टाळावे?
ग्रिल्ड किंवा उकडलेले चिकन खा.
संतुलित आहार घ्या.
जास्त तळलेले आणि तेलकट पदार्थ टाळा.
नियमित व्यायाम करा.
चिकन प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे, पण ते योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने सेवन करणे गरजेचे आहे. उकडलेले किंवा ग्रिल्ड चिकन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.जर तुम्ही चिकन योग्य प्रकारे शिजवून खाल्ले, तर ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलेच ठरेल. त्यामुळे केवळ अफवांवर विश्वास ठेवू नका आणि संतुलित आहाराचा स्वीकार करा