दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध मराठी कॉमेडियन प्रणित मोरेला वीर पहारियावर जोक मारल्या प्रकरणी बेदम लाथा बुक्यांनी जीवघेणा हल्ला कारण्याची घटना समोर आली आहे. प्रणित मोरेला सोलापुरात हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि याची माहिती प्रणितच्या सोशिअल मीडियावरून पोस्ट करत समोर आणण्यात आली आहे. त्याचबरोबर या हल्ल्यात नेमकं काय घडलं याची थोडक्यात माहिती त्या पोस्टद्वारे सांगण्यात आली.
आम्हाला एका भयानक घटनेबद्दल बोलायचं आहे, जी अलिकडेच घडली आहे. 2 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 5.45 वाजता सोलापूरमधील 24K Kraft Brewzz येथे प्रणितचा स्टँड-अप शो झाल्यानंतर तो नेहमीप्रमाणे चाहत्यांना भेटण्यासाठी आणि फोटोसाठी थांबला. गर्दी कमी झाल्यावर, 11-12 जणांचा गट, चाहत्यांच्या वेशात त्याच्याजवळ आला. पण ते फोटोसाठी आले नव्हते. ते त्याच्यावर हल्ला करण्यासाठी आणि धमकावण्यासाठी आले होते. त्यांनी निर्दयपणे त्याला मारहाण केली. त्याच्यावर सतत ठोसे आणि लाथांचा वर्षाव केला, ज्यामुळे तो जखमी झाला. असे त्या पोस्टमध्ये नमूद केले होते.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
या हल्ल्यामागे तनवीर शेख आणि त्याच्या टोळीचा प्रमुख सहभाग होता. त्यांनी थेट धमकी दिली – “पुन्हा वीर पहारिया बाबांवर जोक केला तर परिणाम गंभीर असतील!”सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 24K Kraft Brewzz येथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. सीसीटीव्ही फुटेजसाठी विनंती केली असता ती देण्यास नकार दिला गेला! पोलिसांशी संपर्क साधला, मदतीसाठी येतो म्हणाले… पण कोणीच आलं नाही!एक कलाकार म्हणून, महाराष्ट्रातच आपल्यावर असा हल्ला होईल, याची कल्पनाही नव्हती. हा प्रकार संतापजनक आणि अस्वीकार्य आहे!आम्ही मुंबईहून ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, जेणेकरून भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत.