Mobile screen blue light effects : मोबाईलमधून निघणारी ‘ब्लू लाइट’ त्वचेसाठी धोकादायक, यापासून ‘असा’ करा बचाव
Mobile screen blue light effects : मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यांसारख्या डिव्हाईस स्क्रीनमधून ब्लू लाईटचे उत्सर्जन होतं. हे किरण डोळ्यासह त्वचेसाठी देखील हानिकारक आहेत. याच्यापासून बचाव कसा केला पाहिजे?
By :
Jai Maharashtra News Updated On:
Mobile screen blue light effects : सद्या आपण डिजीटल युगात वावरत आहोत. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यांसारख्या स्क्रीनसमोर लहानग्यांपासून वयोवृद्धापर्यत अधिकाधिक वेळ घालवत आहेत. हे डिव्हाइसेस ज्या ब्लू लाईट (Blue Light) चा उत्सर्जन करतात. हे ब्लू लाईट केवळ डोळ्यांसाठी नाही. तर आपल्या त्वचेसाठीही अतिशय हानिकारक ठरू शकते. संशोधनानुसार, ही निळसर किरणं त्वचेच्या आत शिरून अनेक त्वचारोगांना कारणीभूत ठरतात. ब्लू लाईटमुळे होणारे परिणाम आणि यापासून कसा बचाव करता येईल याचा आढावा आपण या लेखातून पाहुयात.
ब्लू लाईटमुळे त्वचेवर काय दुष्परिणाम होतात
ब्लू लाईटमुळे त्वचेला ताठपणा देणाऱ्या कोलेजनचं विघटन होतं. ज्यामुळं सुरकुत्या आणि लवकर वृद्धत्वाची लक्षणं दिसू लागतात.
दीर्घकाळ स्क्रीनच्या संपर्कात राहिल्यास त्वचेवर काळे डाग, टॅनिंग आणि अनईव्हन स्किन टोन निर्माण होतो.
ब्लू लाईटमुळे त्वचेमधील नैसर्गिक ओलावा कमी होतो. त्यामुळं त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते.
फ्री रॅडिकल्स वाढून त्वचेचे नुकसान होतं. ज्यामुळं एजिंग प्रोसेस वेगाने होते.