Monday, November 17, 2025 01:06:10 AM

Baigan Bhaja Recipe : बंगाली रेसिपी पण महाराष्ट्रात फेमस, झटपट बनवा मसाला बैंगन भाजा

बैंगन भाजा हा एक लोकप्रिय आणि पारंपारिक बंगाली पदार्थ आहे, जो आपल्या चवीने आणि कुरकुरीतपणाने कोणालाही मोहवतो. ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे.

baigan bhaja recipe  बंगाली रेसिपी पण महाराष्ट्रात फेमस झटपट बनवा मसाला बैंगन भाजा

मुंबई: बैंगन भाजा हा एक लोकप्रिय आणि पारंपारिक बंगाली पदार्थ आहे, जो आपल्या चवीने आणि कुरकुरीतपणाने कोणालाही मोहवतो. ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे. काही मसाल्यांच्या मदतीने तुम्ही एक स्वादिष्ट आणि झटपट होणारी डिश बनवू शकता. बैंगन भाजा बाहेरून खमंग आणि आतून मऊ असतो. चला तर जाणून घेऊया ही चविष्ट आणि पारंपारिक रेसिपी कशी बनवायची.

साहित्य: 

3 मोठी वांगी

1 चमचा आले-लसूण पेस्ट

4 चमचे बेसन पावडर

1 चमचा हळद पावडर

1 चमचा धने पावडर

1 चमचा लाल मिरची पावडर

मीठ

1 कप तेल

हेही वाचा: Butter Storage Tips: फ्रीज नाही? काही हरकत नाही! बटर महिनाभर ताजं ठेवण्यासाठी 'हे' 5 जबरदस्त घरगुती उपाय वापरून पहा

कृती:

बैंगन भाजा बनवण्यासाठी सर्वप्रथम वांगीला गोल आकारात कापा. त्यानंतर, त्याला पाण्याने स्वच्छ करा. आता एका वाटीत 2 चमचा तेल 4 चमचे बेसन पावडर, 1 चमचा आले-लसूण पेस्ट, 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि मीठ मिक्स करा. त्यानंतर, हे मिश्रण तुम्ही गोल आकारात कापलेल्या वांग्णांना लावा. आता एका कढईत 1 कप तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर, एक एक करत वांग्यांना कढईत घाला आणि दोन्ही बाजूने फ्राय करा. वांगी फ्राय झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढा. आता बैंगन भाजा खाण्यासाठी तयार आहे.


सम्बन्धित सामग्री