Holi Color Stains: होळीच्या रंगांनी कपडे झाले खराब? 5 मिनिटांत डाग गायब करणारी भन्नाट ट्रिक जाणून घ्या

धुलीवंदनानंतर कपड्यांवर लागलेले हट्टी रंग कसे काढायचे याबाबत अनेकांना प्रश्न पडतो.

Holi Color Stains: होळीच्या रंगांनी कपडे झाले खराब? 5 मिनिटांत डाग गायब करणारी भन्नाट ट्रिक जाणून घ्या

Holi Color Stains: धुलीवंदन म्हटलं की रंगांची उधळण, मित्रमंडळींसोबत मस्ती आणि आनंदाचा जल्लोष. पण रंगांची ही धमाल संपल्यानंतर खरी परीक्षा सुरू होते ती कपडे स्वच्छ करण्याची. विशेषतः पांढरे किंवा नवीन कपडे घालून होळी खेळणाऱ्यांची तर अधिकच पंचाईत होते. रंगांचे हट्टी डाग सहज निघत नाहीत आणि त्यामुळे कपडे खराब होण्याची भीती असते. मात्र काही सोप्या आणि योग्य पद्धती वापरल्यास हे डाग बऱ्याच अंशी कमी करता येऊ शकतात.

सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, रंग लागलेले कपडे लगेच गरम पाण्यात धुवू नका. गरम पाणी वापरल्यास रंग कापडात अधिक घट्ट बसू शकतो. त्याऐवजी साध्या थंड पाण्यात कपडे काही तास भिजत ठेवा. शक्य असल्यास 4  ते 5  तास किंवा रात्रभर भिजू द्या. यामुळे कापडातील रंग सैल होण्यास मदत होते.

यानंतर कपडे हलक्या हाताने पिळून घ्या आणि वेगळ्या पाण्यात धुण्याची प्रक्रिया सुरू करा. डिटर्जंट वापरण्यापूर्वी घरात सहज उपलब्ध असलेला बेकिंग सोडा उपयोगी पडतो. एका बादलीत पाणी घेऊन त्यात दोन ते तीन चमचे बेकिंग सोडा मिसळा. या पाण्यात कपडे १५-२० मिनिटे ठेवा. बेकिंग सोडा रंग कमी करण्यास मदत करतो.

हेही वाचा: Katachi Amti Recipe: होळी स्पेशल! पुरणपोळीची मजा दुप्पट करणारी झणझणीत ‘कटाची आमटी’ बनवा घरच्या घरी

जर डाग खूपच ठळक असतील तर थोडी ब्लीचिंग पावडर वापरता येते; मात्र ती वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे. ब्लीच फक्त पांढऱ्या कपड्यांवरच वापरा. पाण्यात ब्लीचिंग पावडर मिसळून त्यात कपडे काही मिनिटे ठेवा. ही प्रक्रिया उघड्या जागेत किंवा हवेशीर ठिकाणी करा. जास्त वेळ कपडे भिजवू नका, अन्यथा कापड कमकुवत होऊ शकते.

डाग जिथे जास्त दिसत आहेत त्या ठिकाणी मऊ ब्रशने हलकेच घासावे. जोरात घासल्यास कापड खराब होण्याची शक्यता असते. त्यानंतर स्वच्छ पाण्याने कपडे दोन ते तीन वेळा नीट धुवून घ्या, जेणेकरून साबण किंवा ब्लीचचे अंश राहणार नाहीत.

हेही वाचा: Holi Color Remover : होळीचे हट्टी रंग दिवसेंदिवस तसेच राहतात?, करा हे घरगुती सोपे उपाय; रंग चुटकीसरशी होतील गायब

कधी कधी ब्लीच वापरल्यानंतर कपड्यांना पिवळसर छटा येऊ शकते. अशावेळी थोडे लिंबूरस किंवा व्हिनेगर पाण्यात मिसळून कपडे काही मिनिटे भिजवून ठेवावेत. हे नैसर्गिक घटक पिवळसरपणा कमी करण्यात मदत करतात. शेवटी कपडे सावलीत वाळवावेत. थेट कडक उन्हात वाळवल्यास रंगातील उरलेले डाग अधिक ठळक दिसू शकतात.

भविष्यात रंग खेळताना काही काळजी घेतल्यास त्रास टाळता येतो. शक्यतो जुने कपडे वापरणे उत्तम. तसेच नैसर्गिक रंगांचा वापर केल्यास डाग कमी प्रमाणात बसतात आणि त्वचेलाही अपाय होत नाही.

एकंदरीत, होळीचा आनंद घेताना कपड्यांची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य पद्धतीने धुलाई केल्यास रंगांचे हट्टी डागही बऱ्याच प्रमाणात कमी करता येतात आणि तुमचे आवडते कपडे पुन्हा वापरण्यास योग्य बनतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number