Health Tips: भारतीय स्वयंपाकघरात मसाल्यांचं वेगळंच स्थान आहे. आपल्या रोजच्या जेवणात जे मसाले चव आणतात, तेच औषधांसारखेही काम करतात. अशा मसाल्यांपैकी एक आहे कलौंजी(काळं जिरं). ही काळ्या रंगाची छोटीशी बि आपल्या आरोग्यासाठी इतकी फायदेशीर आहे की आयुर्वेदात तिला "मौत को छोड़कर हर बीमारी का इलाज" असं संबोधलं गेलं आहे. म्हणजेच मृत्यू वगळता जवळपास सर्व आजारांवर कलौंजी उपयोगी ठरते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी
कलौंजीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. हे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. बदलत्या ऋतूमध्ये होणारे सर्दी, ताप किंवा व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी कलौंजीचा आहारात समावेश फायदेशीर ठरतो.
हेही वाचा: Anti-Aging Diet: सुरकुत्या, पिग्मेंटेशनला रामराम! त्वचेला तरुण ठेवणारे 'हे' 5 सुपरफूड्स नक्की ट्राय करा
हृदयाचे रक्षण करणारी
आजच्या जीवनशैलीत हृदयविकार हा सर्वात मोठा धोका मानला जातो. पण कलौंजीचा नियमित वापर ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवतो आणि शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करतो. त्यामुळे हृदयविकारांपासून संरक्षण मिळतं. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी सकाळी कोमट पाण्यासोबत कलौंजी सेवन उपयुक्त आहे.
वजन कमी करण्यात मदत
ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठीही कलौंजी अमृतासमान आहे. ही बिया मेटाबॉलिझम वेगवान करतात, ज्यामुळे चरबी पटकन बर्न होते. शरीराची फॅट स्टोअरेज कमी होते आणि फिटनेस टिकवून ठेवता येतो.
डायबिटीजसाठी वरदान
संशोधनानुसार, कलौंजी ब्लड शुगर लेव्हल स्थिर ठेवते. विशेषतः टाईप 2 डायबिटीज असलेल्या रुग्णांसाठी तिचं सेवन अत्यंत उपयुक्त ठरतं. शुगरच्या नियंत्रणाबरोबरच ती पचनसंस्थाही मजबूत करते. अपचन, गॅस, पोटदुखी अशा समस्या दूर करण्यासाठी कलौंजी फायदेशीर ठरते.
हेही वाचा: Health Tips: 'या' झाडांची फळेच नाही तर पानेही गुणकारी, पोटाचे आजार असणाऱ्यांना मिळेल आराम
त्वचा आणि केसांसाठी उत्तम
कलौंजीच्या तेलाचा वापर केस गळती, डॅन्ड्रफ आणि कोरडेपणा कमी करण्यासाठी केला जातो. त्वचेवर लावल्यास पिंपल्स, पिग्मेंटेशन आणि सुरकुत्या कमी होतात. नैसर्गिक सौंदर्य टिकवण्यासाठी हे एक उत्तम उपाय आहे.
सर्दी व खोकल्यावर उपाय
कलौंजीचे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म सर्दी-जुकाम, खोकला, गळ्याची खवखव कमी करतात. शहदासोबत कलौंजीचं सेवन केल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला दिसतो.
मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त
कलौंजी मेंदूची कार्यक्षमता सुधारते. स्मरणशक्ती आणि फोकस वाढवण्यासाठी तिचं सेवन उपयुक्त आहे. महिलांसाठीही ती हार्मोनल संतुलन आणि थायरॉईडच्या समस्यांमध्ये मदत करते.
सेवन करण्याची पद्धत
कलौंजीचा वापर विविध प्रकारे करता येतो. हलक्या आचेवर भाजून पावडर करून ती अन्नात मिसळावी किंवा पाण्यासोबत घेता येते. तिच्या तेलाचाही वापर केस व त्वचेवर थेट करता येतो.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)