Sandwich Without Bread: सँडविच म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो ब्रेड, भाज्या आणि सॉसची जोडगोळी! पण रोज ब्रेड खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी हलकं-फुलकं, हेल्दी खायचं असेल, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. ब्रेड न वापरता तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता स्वादिष्ट रव्याचे सँडविच जे केवळ चविष्ट नाही तर पोटभर आणि पौष्टिक देखील आहे.
साहित्य (Ingredients):
-
रवा (सूजी) – 1 कप
-
दही – अर्धा कप
-
मीठ – चवीनुसार
-
थोडं पाणी – मिश्रण बनवण्यासाठी
-
बारीक चिरलेल्या भाज्या – कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, कोथिंबीर
-
आलं-लसूण पेस्ट – 1 चमचा
-
हिरवी मिरची (बारीक चिरलेली) – 1
-
तेल – शेकण्यासाठी
हेही वाचा: Pressure Cooker Recipes: प्रेशर कुकर फक्त भातासाठी नाही! घरच्या घरी बेकरी आणि हॉटेलसारखे पदार्थ झटपट तयार करा
कृती (Recipe):
-
एका भांड्यात रवा आणि दही एकत्र करून चांगलं मिक्स करा. थोडं पाणी घालून घट्ट पण ओतता येईल असं मिश्रण तयार करा.
-
यात मीठ, चिरलेल्या भाज्या, हिरवी मिरची आणि आलं-लसूण पेस्ट घालून एकजीव करा.
-
हे मिश्रण 10-15 मिनिटं झाकून ठेवा म्हणजे रवा फुलतो आणि टेक्स्चर मऊ होते.
-
आता नॉन-स्टिक तवा गरम करून थोडं तेल लावा.
-
मिश्रणाचं एक पातळ थर पसरवा (जसं आपण उत्तप्पा बनवतो).
-
दोन्ही बाजूंनी सोनसळी होईपर्यंत शेकून घ्या.
-
तयार झालेल्या थरांना कट करून सँडविचच्या आकारात सादर करा.
सर्व्हिंग टिप:
हे सँडविच गरमागरम हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा. सकाळच्या न्याहारीसाठी, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा लंचबॉक्ससाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
हेही वाचा: Homemade Raisins: महागड्या मनुक्यांना म्हणा 'नाही'; फक्त 50 रुपयांत घरच्या घरी बनवा स्वादिष्ट मनुके
हेल्थ बेनिफिट्स:
रवा पचायला हलका असतो आणि उर्जेचा उत्तम स्रोत आहे. यात फायबर, आयर्न आणि प्रोटीनही असतं. ब्रेडऐवजी रव्याचं सँडविच खाल्ल्याने तुम्हाला फक्त चवच नाही तर आरोग्याचाही फायदा होतो.
पुढच्या वेळी सँडविच बनवताना ब्रेडऐवजी रवा वापरून ही हेल्दी रेसिपी नक्की ट्राय करा. एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा बनवावंसं वाटेल, इतकी टेस्टी आहे ही डिश!