Tuesday, November 18, 2025 03:16:52 AM

Budget Trip: परदेशात फिरायला जायचंय पण बजेट नाही? काळजी नको! भारतातच आहे असं अप्रतिम सुंदर ठिकाण

निसर्गाच्या सान्निध्यात थोडावेळ शांत बसायला, डोंगरांमधून फिरायला किंवा दैनंदिन धावपळीला थोडा ‘पॉज’ द्यायला आजकाल सगळेच इच्छुक. पण त्यासाठी परदेशात जाण्याची गरज नाही.

budget trip परदेशात फिरायला जायचंय पण बजेट नाही काळजी नको भारतातच आहे असं अप्रतिम सुंदर ठिकाण

Budget Trip: निसर्गाच्या सान्निध्यात थोडावेळ शांत बसायला, डोंगरांमधून फिरायला किंवा दैनंदिन धावपळीला थोडा ‘पॉज’ द्यायला आजकाल सगळेच इच्छुक. पण त्यासाठी परदेशात जाण्याची गरज नाही. कारण भारतातच अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे जाण्यानंतर मन लगेच ताजेतवाने होतं. त्यात सर्वोत्तम पर्याय म्हणजे 'सिक्कीम'. बजेट-फ्रेंडली, सुरक्षित आणि अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं हे राज्य ट्रॅव्हल लव्हर्सना पुन्हा पुन्हा बोलावून घेतं.

गंगटोक: ट्रिपची परफेक्ट सुरुवात

सिक्कीमची राजधानी गंगटोक हे फक्त शहर नाही, तर पर्वतांमध्ये लपलेली एक खास भावना आहे. इथलं एमजी रोड संध्याकाळी फिरायला 'must visit spot' रंगीबेरंगी लाईट्स, स्थानिक कलाकारांची स्टोअर्स, कॅफे, फूड आणि इंस्टाग्राम-वर्थी कोपरे सगळंच एकदम चित्रात बसण्यासारखं. इथल्या जवळच्या मठांना भेट दिली तर अध्यात्मिक शांतीचा अनुभव मिळतो.

हेही वाचा:Unique Station India: आता व्हिसाची कटकट विसरा; 'या ' स्टेशनवर उतरलं की काही मिनिटांतच परदेशात प्रवेश

त्सोमगो लेक आणि बाबा हरभजन मंदिर:

दुसऱ्या दिवशी सकाळी त्सोमगो लेककडे जाणं हा ‘bucket list moment’. निळसर शांत पाण्याचं प्रतिबिंब आणि भोवतालची बर्फाळ शिखरं… ते दृश्य शब्दात मावत नाही. इथून पुढे बाबा हरभजन सिंह मंदिराला भेट धैर्य, श्रद्धा आणि देशसेवेची आठवण करून देणारी जागा.

नाथुला पास: आयुष्यभर न विसरण्याजोगा अनुभव

गंगटोकहून थोडं पुढे नाथुला पास. बर्फाच्छादित दऱ्या आणि उंचीची खोली एकदम ‘cinematic’ वाटते. सीमेच्या इतक्या जवळ उभं राहण्याची भावना ही एक वेगळीच. हे ठिकाण जवळजवळ प्रत्येक टुरिस्टला ‘once in lifetime’ अनुभव देतं.

लाचुंग: छोटं गाव पण अप्रतिम निसर्ग

यानंतर गंगटोकहून लाचुंगचा प्रवास. रस्त्यात दिसणारे धबधबे, ढगांनी वेढलेले रस्ते आणि हिरवागर्द निसर्ग मनाचं स्पा ट्रीटमेंटच. लाचुंग गाव छोटं असलं तरी शांतता मात्र अमर्याद.

हेही वाचा: Hidden Travel Destinations: स्वर्गापेक्षा कमी नाही! भारतातील 5 अद्भुत ठिकाणं जिथे गर्दी नाही, फक्त शांतता आणि निसर्ग

युमथांग व्हॅली आणि झिरो पॉइंट: ट्रिपचा 'ग्रँड फिनाले'

तिसऱ्या दिवशी सकाळी युमथांग व्हॅली. रंगीबेरंगी फुलांचे मैदान, बर्फाच्छादित भाग, आणि थंड हवा एखादी स्वप्नभूमी जणू.हवामान साथ देत असेल तर झिरो पॉइंटला जरूर जा इथे निसर्ग सर्वात सुंदर स्वरूपात दिसतो.

परतीचा दिवस: 

ट्रिप संपतांना गंगटोकमध्ये शॉपिंग करा स्थानिक आठवणी ट्रिप कायमची खास बनवतात.

 


सम्बन्धित सामग्री