उन्हाळ्यात तापमान वाढल्याने त्वचेसाठी विशेष काळजी घेणे आवश्यक असते. या काळात त्वचेवरील उष्णता कमी करण्यासाठी आणि त्वचेला ताजेतवाने ठेवण्यासाठी अनेक जण बर्फाचा वापर करतात. पण खरोखरच उन्हाळ्यात चेहऱ्यावर बर्फ फिरवणे फायदेशीर आहे का? त्याचे काय फायदे आणि तोटे असू शकतात? जाणून घेऊया.
बर्फ लावण्याचे फायदे:
त्वचेला ताजेतवाने ठेवते
बर्फामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि गरम हवामानात ताजेतवाने वाटते. उन्हाच्या प्रभावामुळे आलेली सुस्ती कमी करण्यासाठी हे एक प्रभावी घरगुती उपाय आहे.
हेही वाचा: खोक्याच्या अटकेवर धसांची प्रतिक्रिया
त्वचेवरील सूज कमी होते
बर्फाच्या थंडगार स्पर्शामुळे त्वचेवरील जळजळ आणि सूज कमी होण्यास मदत होते. डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी देखील बर्फ उपयुक्त ठरतो.
मुरुमांवर उपाय
मुरुम आणि पिंपल्सच्या त्रासावर बर्फ लावल्यास आराम मिळतो. बर्फामुळे त्वचेवरील लालसरपणा आणि जळजळ कमी होते.
छिद्र संकुचित होण्यास मदत
गरमीमुळे चेहऱ्यावरील त्वचेच्या छिद्रांमध्ये घाम आणि घाण साचते. बर्फाच्या वापरामुळे छिद्र संकुचित होतात आणि त्वचा अधिक स्वच्छ व तजेलदार दिसते.
मेकअप टिकून राहतो
मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर बर्फ फिरवल्यास मेकअप जास्त वेळ टिकतो आणि चेहरा तेलकट होत नाही.
बर्फ लावण्याचे तोटे:
अतिशय थंड तापमानामुळे त्वचेला धक्का बसू शकतो
जास्त वेळ बर्फ लावल्यास त्वचेला अचानक थंडावा मिळून रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो.
ड्राय स्किनसाठी हानिकारक
कोरड्या त्वचेवर बर्फ जास्त वेळ लावल्यास त्वचा अधिक कोरडी होऊन तडा जाऊ शकतो.
सेंसेटिव्ह स्किन असणाऱ्यांसाठी नुकसानकारक
संवेदनशील त्वचेसाठी बर्फाचा थेट संपर्क खाज, जळजळ किंवा लालसरपणा निर्माण करू शकतो.
कसा वापरावा?
बर्फाचा वापर करण्यापूर्वी कपड्यात गुंडाळून हलक्या हाताने चेहऱ्यावर फिरवा. थेट त्वचेवर बर्फ ठेवू नका. दिवसातून एकदा किंवा दोनदा 2-3 मिनिटे बर्फ फिरवणे योग्य ठरेल. उन्हाळ्यात त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी योग्य प्रकारे बर्फाचा वापर करा आणि त्वचेचे आरोग्य टिकवून ठेवा!