केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार मिळतात. मात्र, अनेकदा आयुष्यान कार्ड असूनही हॉस्पिटल उपचार देण्यास नकार देतात. अशावेळी नेमके काय करावे,हे माहिती असणे गरजेचे आहे.
कोणत्या हॉस्पिटलमध्ये उपचार मिळतो?
आयुष्मान या कार्डवर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मोफत उपाचार मिळतील असे नाही. खरं तर ज्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांची नोंदणी या योजनेत आहे, त्याच हॉस्पिटलमध्ये उपचार मिळतात. शिवाय आजार आणि उपचार योजनेच्या नियमामध्ये समाविष्ट असणे अत्यंत आवश्यक आहे.
आपल्या शहरातील हॉस्पिटल कसे शोधावे?
तुमच्या शहरातील पॅनलवरील हॉस्पिटल तपासण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या. त्यानंतर ‘https://hem.nha.gov.in/search’ येथे राज्य, जिल्हा तसेच पिनकोड टाकून तुम्ही तुमच्या जवळच्या रुग्णालयांची यादी लगेच पाहू शकता. हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी तिथे हवा असलेला उपचार उपलब्ध आहे का, याची खात्री करु शकता.
उपचार नाकारल्यास तक्रार कुठे करावी?
जर तुम्ही पात्र असूनही संबंधिक रुग्णालय उपचार नाकारत असेल तर तक्रार करा.
1)14555 या राष्ट्रीय हेल्पलाइनवर कॉल करा.
2) हॉस्पिटलचे नाव, पत्ता आणि नकाराचे कारण सांगा.
3) आयुष्मान कार्ज तसेच मेडिकल रिपोर्ट आणि नकाराचे पुरावे नक्की सोबत ठेवा.
4) महत्त्वाचे म्हणजे तक्रार केल्यानंतर मिळालेला संदर्भ क्रमांक जपून ठेवा आणि तक्रारीनंतर चौकशी केली जाईल तसेच नियमांचे उल्लंघन आढळल्यास रुग्णालयावर कारवाई होऊ शकते.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update