मुंबई : उन्हाळा हा ऋतू वजन कमी करण्यासाठी चांगला मानला जातो. उन्हाळ्यात तापमान तीव्रता जास्त असते. त्यामुळे शरीराला घाम येतो. यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते. अशात जर तुम्ही वजन कमी करण्याच्या विचारात असाल तर उन्हाळा तुमच्यासाठी बेस्ट आहे. या ऋतूमध्ये तुम्ही वेगाने वजन कमी करू शकता.
कलिंगड
उन्हाळ्यात कलिंगड हे उत्तम फळ आहे. हे वजन कमी करण्यासाठी मदत करते. कलिंगडमध्ये पाणी जास्त असते. यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि वजन कमी करण्यात मदत होते. कलिंगडमध्ये विटामिन सी आणि लाइकोपीन आहे. ज्यामुळे शरीर ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचते. कलिंगडचे सेवन केल्याने यकृत उत्तम राहते आणि शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते.

हेही वाचा : नाशिकमध्ये कृष्णा आंधळे फिरत असल्याचा दावा ठरला..; नाशिक पोलिसांचा खुलासा
नारळ पाणी
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणी हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स असतात. जे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात आणि वजन कमी करण्यासाठी मदत करतात. नारळ पाणीमध्ये विटामिन सी आणि पोटॅशियमदेखील असतात. जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. उन्हाळ्यात रोज सकाळी नारळ पाणी प्यायल्याने तुम्ही स्वत:ला निरोगी आणि तंदुरूस्त ठेवू शकता. यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा टिकून राहते.

सॅलड
उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी सॅलड एक चांगला पर्याय आहे. यामध्ये भाजी, फळे आणि ड्रायफ्रुट्स असतात. जे शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे प्रदान करतात आणि वजन कमी करण्यासाठी मदत करतात. सॅलडमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि फायबर असतात. जे तुमचे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.

तुम्ही सॅलडमध्ये काकडी, ब्रोकली(फ्लॉवर), कोबीचेही सेवन करू शकता. सॅलडमुळे शरीरातील पचनक्रिया सुधारते. तुम्ही तुमच्या डाइटमध्ये या गोष्टींचे सेवन केल्याने वजन कमी करू शकता. वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम आणि निरोगी आहाराचे पालन करणे गरजेचे आहे.
Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.