नाशिक : बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. बरेच दिवसांपासून त्याचा शोध सुरू आहे. परंतु कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही. दरम्यान या प्रकरणातील पहिली सुनावणी बुधवारी झाली आणि त्याच दिवशी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये पाहिल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.
कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसला असा खुलासा नाशिक जिल्ह्यातील गंगापूर रोड येथील नागरिकांनी केला. गंगापूर रोडला आंधळे फिरत असल्याचे नाशिकमधील नागरिकांनी म्हटले आहे. नागरिकांच्या दाव्यानंतर पोलिसांकडून शोध मोहिम सुरू करण्यात आली होती. पोलिसांकडून गंगारोड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु नागिरकांनी पाहिलेला व्यक्ती कृष्णा आंधळे नसल्याचा दावा पोलिसांनी केला. आज पुन्हा त्या परिसरात शोध घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा : दादा खिंडकरकडून मारहाण झालेल्या ओमकार सातपुतेचा व्हिडीओ समोर; कोण आहे ओमकार सातपुते?
'तो' व्यक्ती कृष्णा आंधळे नाही
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार असून पोलिस त्याचा शोध करत आहेत. देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतिक घुलेसह आणखी तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांची हाती लागला नाही. पोलिसांकडून आंधळेचा कसून शोध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आंधळे जिवंत असेल का असा प्रश्न पडला होता. अशातच बुधवारी नाशिकमध्ये कृष्णा आंधळेला पाहिल्याचे समोर आले. नाशिकमधील गंगापूर रोडवर कृष्णा फिरत असल्याचे नाशिककरांनी सांगितले होते. या माहितीची दखल घेत पोलिस आंधळेचा शोध घेण्यासाठी तत्पर झाले आणि त्याचा शोध सुरू केला. नाशिकमधील गंगापूर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर तो व्यक्ती कृष्णा आंधळे नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. कालपासून जो व्यक्ती कृष्णा आंधळे आहे असं सांगितलं जात होतं. तो व्यक्ती आंधळे नसल्याचं समोर आलं आहे.
दिवसभराच्या शोध मोहिमेनंतर नाशिकमध्ये कृष्णा आंधळे असल्याचा पुरावा पोलिसांना सापडला नाही. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा तिथे राहणाऱ्या गीतेश बनकर या व्यक्तीने केला होता. या दाव्यानंतर काल दिवसभर पोलिसांनी शोधमोहीम राबवली. अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील पोलिसांनी तपासले. ज्या व्यक्तीने कृष्णा आंधळे याला पाहिले होते. त्या व्यक्तीने केलेल्या वर्णानुसार पोलिसांनी शोध घेतला. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात प्रत्यक्षदर्शीने केलेल्या वर्णनाचा व्यक्ती सापडला. मात्र तोच कृष्णा आंधळे असल्याचा पुरावा नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील संशयित आरोपी कृष्णा आंधळे सध्या फरार आहे.