Friday, December 05, 2025 02:28:22 AM

Winter Health Tips: या हिवाळ्यात ट्राय करा ‘या’ 5 प्रकारच्या हर्बल टी; शरीर राहील गरम आणि इम्युनिटी होईल डबल स्ट्राँग

हिवाळ्यात शरीर गरम ठेवण्यासाठी आणि इम्युनिटी मजबूत करण्यासाठी हर्बल टी हा उत्तम पर्याय आहे. अदरक, तुळस, लवंग, हळद यांसारख्या नैसर्गिक हर्ब्समुळे सर्दी-खोकला टाळण्यातही मदत होते.

winter health tips या हिवाळ्यात ट्राय करा ‘या’ 5 प्रकारच्या हर्बल टी शरीर राहील गरम आणि इम्युनिटी होईल डबल स्ट्राँग

Winter Health Tips: हिवाळा म्हटलं की थंड गार वारे, धुके, हातपाय गार होणं आणि शरीरात सतत सुस्तपणा वाटणं ही लक्षणं सामान्य आहेत. तापमानात अचानक घसरण होते आणि हवामान ओलसर थंड बनतं, तेव्हा शरीराचा नेहमीचा टेम्परेचर बॅलन्स कमी होतो. याच काळात सर्दी-खोकला, घसा दुखणे, नाक बंद होणे, अंगदुखी अशा हंगामी समस्यांची सुरवात होते. अशावेळी रोगप्रतिकारशक्तीच सर्वात जास्त लागते. म्हणूनच हिवाळ्यात उबदार ठेवणारे, शरीराला ‘इनसाइड हीट’ देणारे काही नैसर्गिक उपाय दैनंदिन दिनचर्येत सामावणे उपयोगी ठरू शकते. त्यात सर्वात सोपा आणि परिणामकारक पर्याय म्हणजे 'हर्बल टी.'

हर्बल टी ही चहा-पत्ती, दूध आणि साखर वापरून बनवली जात नाही, तर पाण्यात नैसर्गिक औषधी वनस्पती उकळून त्यातून अर्क काढला जातो. विविध औषधी गुणधर्म असलेली हिरव्या पानांची झाडं, मसाले आणि रूट्स यात वापरले जातात. अशा चहाचा फायदा असा की तो पचायला हलका असतो, पोटावर ताण येत नाही आणि शरीराला मायक्रो न्यूट्रिएंट्स थेट मिळतात. हिवाळ्यात दिवसातून एकदा या हर्बल टींपैकी एखादी घ्यायची सवय लावली तर शरीर गरम राहण्यासोबतच इम्यून सिस्टिम मजबूत करण्यास मदत होऊ शकते.

हेही वाचा:Winter Health Tips: नाक वाहतंय, सारखा खोकला येतोय? चिंता करू नका; करा 'हे' 5 घरगुती उपाय

1) आलं आणि तुळस वापरून तयार केलेली हर्बल टी
आलं(अदरक) ‘वॉर्म’ फूड मध्ये मोडते कारण त्यात नैसर्गिक हीटिंग कंपोनंट्स असतात. घसा दुखणे, खोकला, कफ या तिन्ही गोष्टींमध्ये अदरक लगेच आराम देते. तुळसही प्राचीन आयुर्वेदात रोगांवरची औषधी वनस्पती मानली जाते. या दोघांचं कॉम्बिनेशन हिवाळ्यात ‘बेस्ट मोर्निंग ड्रिंक’ ठरू शकतं.

2) ज्येष्ठमध आणि लवंग घातलेला चहा
ज्येष्ठमध घशासाठी सर्वात सौम्य आणि कारगर औषध मानलं जातं. खोकला वाढताना ज्येष्ठमध शांत प्रभाव देतो. लवंगमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. या दोघांचा अर्क हिवाळ्यात घेतल्यास घसा खवखवणं कमी होतं आणि फ्लू सिंप्टम्स कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत मिळते.

3) हळद आणि दालचिनी हर्बल टी - हा सुद्धा एक उपयुक्त पर्याय
हळद म्हणजे ‘नॅचरल इन्फ्लेमेशन फायटर’. दालचिनी शरीराला आतून उब देणारी. दोघेही दिवसातून एकदा घेतले तर शरीराची रोगप्रतिकार प्रणाली सक्रिय राहते. या हर्बल टीत दूध मिसळून बनवलेला प्रकारही रात्री झोपण्यापूर्वी फायदेशीर मानला जातो.

4) सर्वात जास्त फायदेशीर निलगिरी लीफ टी
निलगिरीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. सर्दीची शिंक-नाक वाहणे-घसा बंद होणे असे सिंप्टम्स कमी करण्यास हा चहा मदत करू शकतो. सूज, वेदना आणि ‘थकवा’ मध्येही हा चहा काहींसाठी उपयोगी ठरतो.

हेही वाचा: Winter Food Tips : हिवाळ्यात शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी हे पौष्टिक लाडू नक्की खा; बनवायला आहेत अगदी सोपे

महत्त्वाची टिप:
हर्बल टी बनवताना दूध, साखर आणि चहा पावडर पूर्णपणे टाळावी. कारण या हर्बल अर्काची नैसर्गिकता कमी होऊ शकते.

हिवाळ्यातील रोजच्या जेवणात पालेभाज्या, नट्स, बदाम, अक्रोड, तीळ आणि हंगामी फळांसोबत एक कप हर्बल टी शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती  वाढवण्यासाटी फायदेशीर ठरू शकतो!

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
 


सम्बन्धित सामग्री