Wednesday, June 25, 2025 01:27:39 AM

विजेचा धक्का बसून 10 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील वारजे परिसरात विजेचा धक्का लागल्यामुळे दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

विजेचा धक्का बसून 10 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

पुणे: पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील वारजे परिसरात विजेचा धक्का लागल्यामुळे दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुण्यातील वारजे येथील रामनगर भागामध्ये सायंकाळी 5: 45 च्या सुमारास ही घटना घडली आहे. मृत चिमुकल्याचे नाव मयंक प्रदीप आडगळे (वय: 10) आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अडगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा: गद्दार ज्योती मल्होत्राची फॉरेन्सिक तपासणीत पोलखोल; दानिशसह अनेक पाक अधिकाऱ्याशी कोडवर्डमध्ये चॅटिंग

नेमकं प्रकरण काय?

मयंक त्याच्या मित्रांसोबत घराबाहेर खेळत होता. दरम्यान, खेळत असताना चुकून मयंक त्याच्या घरासमोर असलेल्या लोखंडी विजेच्या खांबाला टेकला. ज्यामुळे, त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि क्षणातच तो खाली कोसळला. या घटनेची माहिती मिळताच, त्याच्या कुटुंबीयांनी आणि शेजारच्यांनी क्षणाचाही विलंब न करता मयंकला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मयंकला मृत घोषित केले. यामुळे, मयंकच्या कुटुंबियांना आणि शेजारच्यांना अश्रू अनावर झाले. 

हेही वाचा: 'या' राशींना होणार आर्थिक फायदा; जाणून घ्या

वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर विजेचा खांब हा महावितरणच्या अधिकार क्षेत्रात येत असून, या अपघाताची माहिती मिळताच महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्वरित संपर्क साधण्यात आला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. परिसरातील नागरिकांनी यापूर्वीही विजेच्या खांबांची खराब अवस्था आणि उघड्या वायरिंगबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले होते, मात्र योग्य उपाययोजना न झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत.


सम्बन्धित सामग्री