औरंगाबाद, ५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: यंदा मान्सून उशिरा दाखल झाला आहे. त्यातच पावसाने देखील पाठ फिरवल्याने मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विभागातील अनेक प्रकल्प कोरडी पडली आहे, तर इतर प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाले आहे.
दरम्यान, मराठवाड्याची तहान भागावणारा जायकवाडी धरणाचा पाणीसाठा देखील चिंता वाढवणारा ठरत आहे. कारण, गेल्यावर्षी आजच्या दिवशी जायकवाडी धरणात ९०.९७ टक्के पाणीसाठा होता. मात्र, यंदा हाच पाणीसाठा २९.५० टक्के आहे. त्यामुळे आगामी काळात जोरदार पाऊस न झाल्यास पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २८ गाव आणि ४ वाड्यांवर एकूण ३५ टँकर सुरु आहेत. जालना जिल्ह्यात २७ गावं आणि १८ वाड्यांवर एकूण ३६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.