Saturday, June 14, 2025 04:43:52 AM

68 वर्षीय आज्जीने उत्तीर्ण केली दहावीची परीक्षा

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील जामनी येथील 68 वर्षीय इंदूताई परमेश्वर बोरकर यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विशेष म्हणजे आजी आणि नातू एकाच वेळी परीक्षेला बसले होते आणि उत्तीर्ण झाले.

68 वर्षीय आज्जीने उत्तीर्ण केली दहावीची परीक्षा

प्रमोद पाणबुडे, वर्धा प्रतिनिधी: वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील जामनी येथील 68 वर्षीय इंदूताई परमेश्वर बोरकर यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सतरा नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देणाऱ्या या आज्जीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच आज्जीसोबत त्यांचा नातू धीरज देखील दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आज्जींना 51 टक्के गुण मिळाले आहेत आणि त्यांच्या नातूला 75 टक्के गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे आजी आणि नातू एकाच वेळी परीक्षेला बसले होते आणि दोघेही उत्तीर्ण झाले. केवळ सातवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या इंदूताई बोरकरांना पुढे शिकता आले नाही, परंतु वयाच्या 68 व्या वर्षी प्रथम संस्थेकडून मिळालेल्या दुसऱ्या संधीचा फायदा घेत त्यांनी दहावीची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाले.

हेही वाचा: खानमंडळींना लाज वाटत नाही? शिवसेना प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांचे वक्तव्य

कोण आहेत इंदूताई परमेश्वर बोरकर?

वर्धा जिल्ह्यात असलेल्या जामनी गावातील बचत गटाच्या कामात इंदूताई सतत पुढाकार घेत असतात. त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले असून त्याच वेळी लग्न झाले. शिकण्याची इच्छा असूनही त्यांना पुढे शिकता आले नाही. मात्र, प्रथम संस्थेने शिकण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना दुसरी संधी दिली, तेव्हा इंदूताई यांनी एक वर्ष दहावीचे धडे घेतले आणि परीक्षा दिली. त्यांच्यासोबत त्यांचा नातू धीरजही परीक्षा केंद्रावर होता. आजी आणि नातू दोघेही एकाच वेळी दहावीची परीक्षा देत चर्चेचा केंद्रबिंदू ठरले. 'म्हातारीला या वयात परीक्षा सुचली', असे म्हणत काहींनी त्यांची टीका केली, परंतु आता याच म्हातारीने दहावीच्या परीक्षेत यश मिळवून बोलणाऱ्यांची तोंड बंद केली आहे.


सम्बन्धित सामग्री