रायगडच्या दिवेआगर येथे 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या प्रकरमी पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे. या प्रकरणी तब्बल 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आळंदीमधील एका खाजगी क्लासेसचे हे विद्यार्थी सहलीसाठी दिवेआगरला गेले होते, तिथेच समुद्रात बुडून या आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला आहे.
या प्ररणात सर्वात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. ज्यात क्लासेसच्या शिक्षकांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आलेला असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. आळंदीच्या विनर्स अकॅडमीचे संस्थापक अमर नाडक, मृणाल नरसखेडे, सभा महबूब इनामदार, शिल्पा अमन नाडक तसेच वैशाली मृणाल नरसखेडे अशा पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. विद्यार्थ्याच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप हा मृत विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. विद्यार्थी राजवीर वाहिले यांच्या वडिलांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झालेला असून, पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.