वय वर्ष फक्त 10…तरीही गंभीर गुन्हा दाखल, मुंबईतील थरारक घटनेमागील रहस्य उलगडणार; नेमकं प्रकरण काय?

गोरेगाव पूर्वेतील शिवशाही परिसरात एका 10 वर्षीय शेजारील मुलीने इमारतीच्या डक्टमध्ये 18 महिन्यांच्या बाळाला ढकलल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले होते. आता या घटनेबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

वय वर्ष फक्त 10…तरीही गंभीर गुन्हा दाखल, मुंबईतील थरारक घटनेमागील रहस्य उलगडणार; नेमकं प्रकरण काय?
Goregaon crime News

मुंबईतील गोरेगाव पूर्व भागातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली होती. गोरेगाव पूर्वेतील शिवशाही परिसरात एका 10 वर्षीय शेजारील मुलीने इमारतीच्या डक्टमध्ये 18 महिन्यांच्या बाळाला ढकलल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले होते. ही घटना मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील शिवशाही परिसरात 14 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 9.15 वाजता घडली असल्याची माहिती समोर आली. 18 महिन्यांच्या चिमुरडीचा इमारतीच्या डक्टमध्ये पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.

आता या घटनेबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. घटनेनंतर चार दिवसांनी दिंडोशी पोलिसांनी मृत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे 10 वर्षांच्या मुलीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी 10 वर्षांच्या मुलीला बाल न्याय मंडळासमोर हजर केले. मंडळाने एका स्वयंसेवी संस्थेची नियुक्ती केली आणि संबंधित मुलीला समुपदेशन घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. तर दुसरीकडे मृत मुलीच्या आईने घटनेच्या परिस्थितीची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

हेही वाचा- मोबाईल स्टेटस ठेवल्याच्या रागातून 16 वर्षीय मुलावर कोयत्याने सपासप वार, हल्लेखोरही अल्पवयीन; थरारक घटना CCTV त कैद

नेमकं प्रकरण काय?
14 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान दहा वर्षाची मुलगी शेजारच्या घरी असलेल्या लहान मुलीसोबत खेळायला आली. यावेळी शेजारी राहणाऱ्या 10 वर्षीय मुलीने खेळताना चिमुरडीला उचलून इमारतीच्या डक्टमध्ये ढकलल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी जखमी चिमुरडीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. ही घटना घडल्यानंतर सुरुवातीला सर्वांनाच हा एक अपघात असल्याचे वाटले होते.

हेही वाचा- मन सुन्न करणारी घटना! मुंबईत 10 वर्षाच्या मुलीने 18 महिन्यांचा बाळाला इमारतीवरुन फेकले; कारण काय?

मात्र पोलिसांनी जेव्हा सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तेव्हा सत्य समोर आले आणि सर्वांच्या अंगावर काटा आला. 18 महिन्यांच्या मुलीसोबत खेळत असलेली 10 वर्षांची मुलगी चिमुरडीला लिफ्टच्या दिशेने जाण्यासाठी खुणावत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळत होते. त्यानंतर तिने चिमुरडीला उचलून जिन्यावरून खाली फेकले आणि तेथून निघून गेली. दरम्यान संबंधित प्रकरणानंतर आता मृत मुलीच्या आईने 10 वर्षीय मुलीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास दिंडोशी पोलीस करत आहेत.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number