पिंपरी चिंचवड: बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. नराधम बापाने मुलीवर अत्याचार केला आहे. लोणावळ्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे.
लोणावळ्यात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली असून जन्मदात्या पित्याने मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी नराधम बापाच्या मुसक्या लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आवळल्या असून पीडित मुलगी अल्पवयीन असूनही बापाने पोटच्या मुलीवर हा अत्याचार केल्याने, मुलीच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.
आजकाल घडणाऱ्या बलात्काराच्या घटना काळीमा फासणाऱ्या आहेत. नुकतच एका बापाने आपल्या पोटच्या लेकरावर बलात्कार केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नराधमाच्या अंगावर वासनेचं भूत सवार झालं होतं. त्यातूनच त्याने आपल्या मुलीवर अत्याचार केला. हा प्रकार करताना त्याला एकदाही आपल्या लेकराचा विचार आला नसेल का? अशा पापी लोकांना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे.
हेही वाचा: झाड तोडण्यास विरोध केल्याने महिलेवर जीवघेणा हल्ला,16 जणांवर गुन्हा दाखल
समाजात बलात्कारासारखा घटना घडत आहेत. त्यामुळे चीड येत आहे. एका वडिलांनीच असं केलं मग दुसऱ्या लोकांचा प्रश्नच येत नाही. ही घटना ऐकून त्रास होत आहे. बलात्काराच्या घटनांना आळा बसण्यासाठी कठोर कायदे बनवले पाहिजेत असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
बलात्काराची घटना दुर्देवी आहे. नात्याला काळीमा फासणारा प्रकार आहे. नात्यात असा प्रकार होतो. घरात मुली सुरक्षित नाहीत असे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. बऱ्याच वेळा अशा घटनांमध्ये प्रकरणे दडपली जातात. पुराव्या अभावी आरोपी सुटतो. अशा प्रकारच्या घटनांमध्ये हवे तसे वकील मिळत नाहीत. स्पेशल वकील नेमले पाहिजेत. बलात्काराची प्रकरणे फास्टट्रॅक कोर्टात चालवली गेली पाहिजेत असेही अंधारे म्हणाल्या.