Wednesday, July 09, 2025 09:43:23 PM

झाड तोडण्यास विरोध केल्याने महिलेवर जीवघेणा हल्ला,16 जणांवर गुन्हा दाखल

झाड तोडण्याला विरोध केल्याने महिलेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना वडवणीच्या देवळा- कोरडे वस्तीमधली आहे. शेताच्या बांधावरील वृक्षतोडीस विरोध केल्याने महिलेला लाठीने मारहाण करण्यात आली.

झाड तोडण्यास विरोध केल्याने महिलेवर जीवघेणा हल्ला16 जणांवर गुन्हा दाखल

बीड: झाड तोडण्याला विरोध केल्याने महिलेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना वडवणीच्या देवळा- कोरडे वस्तीमधली आहे. शेताच्या बांधावरील वृक्षतोडीस विरोध केल्याने महिलेला लाठीने मारहाण करण्यात आली. महिलेला शिवीगाळ करत कुटुंबियांनाही मारहाण केली आहे. या प्रकरणी आरोपी बालकृष्ण शिंदेसह 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा: Golden Toilet: इंग्लंडमध्ये झाली 'टॉयलेट चोरी', चोरीप्रकरणात दोघांना 20 वर्षांची शिक्षा

धक्कादायक! झाड तोडण्यास विरोध केला म्हणून महिलेसह कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला
बीडमधून एक संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आली आहे. शेताच्या बांधावरील झाडं तोडण्यास विरोध केल्याने एका महिलेवर आणि तिच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा प्रकार वडवणी तालुक्यात घडला आहे. देवळा ते कोरडे वस्ती दरम्यानच्या पायवाटेवर गट क्रमांक 202, 203, 205 आणि 251 या शेताच्या बांधावरील तब्बल 80-90 वर्षे जुनी लिंबाची झाडं तोडली जात होती. महिलेनं झाड तोडण्याचा जाब विचारताच, तिला चापट मारून शिवीगाळ करत रस्ता काढण्याची धमकी देण्यात आली. यावेळी तिचे पती, सासू-सासरे आणि इतर कुटुंबीय घटनास्थळी पोहोचताच, हातातील काट्यांनी जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी बालकृष्ण शिंदे यांच्यासह 16 जणांविरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेतकऱ्यांच्या हक्कावर चाललेली बळजबरी आणि महिलांवरील हिंसाचाराचा हा प्रकार, निश्चितच संतापजनक आहे. या प्रकरणात आणखी कोणकोणत्या कारवाया होणार आहेत, पोलिसांची पुढील भूमिका काय असेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे.


सम्बन्धित सामग्री