Friday, March 13, 2026 07:32:05 AM

Bhiwandi Mayor : भिवंडीत महापौर निवडणुकीला वेगळं वळण! ऐनवेळी भाजपाकडून उमेदवार बदल; राजकीय वर्तुळात खळबळ

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महापालिकेतील सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरु असताना महापौरपदाच्या निवडणुकीला नवे वळण लागले. भाजपकडून ऐनवेळी महापौरपदाचा उमेदवार बदलण्यात आला आहे.

bhiwandi mayor  भिवंडीत महापौर निवडणुकीला वेगळं वळण ऐनवेळी भाजपाकडून उमेदवार बदल राजकीय वर्तुळात खळबळ

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महापालिकेतील सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरु असताना महापौरपदाच्या निवडणुकीला नवे वळण लागले. भाजपकडून ऐनवेळी महापौरपदाचा उमेदवार बदलण्यात आला आहे. भाजपकडून नारायण चौधरी यांच्याऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना महापौरपदाचा उमेदवार म्हणून संधी देण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा भाजप शहराध्यक्ष रविकांत सावंत यांनी केली असून नगरसेवकांना लेखी पत्राद्वारे निर्णयाची माहिती देखील कळविण्यात आली.

हेही वाचा- Bhigwan Girl Kidnapped : एकीकडे हिंदू संघटना आक्रमक, दुसरीकडे अपहरणकर्त्या मुलीचा संभ्रमात टाकणारा व्हिडीओ समोर; भिगवणमधील वातावरण चिघळलं

तर दुसरीकडे स्नेहा मेहुल पाटील यांना संधी दिलेली असतानाही नारायण चौधरी यांनी महापौरपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच ते पक्षाच्या या निर्णयामुळे नाराज असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे भिवंडीत राजकीय घडामोडींना वेग आलेला असून अंतर्गत घडामोडींवर नगरसेवकही लक्ष ठेवून आहेत. भिवंडी महापालिकेतील सत्तास्थापनेसाठी काँग्रेस, भाजप, सेक्युलर फ्रंट आदी पक्ष इच्छुक आहेत. भिवंडी पालिकेत भाजपाचे 22 शिवसेना शिंदे गटाचे 12, एक अपक्ष असे 35 चे संख्याबळ आहे. बहुमतासाठी 46 चे संख्याबळ आहे. हा आकडा गाठण्यासाठी कोणता पक्ष समीकरण जुळवणार, याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. अशातच भाजपने ऐनवेळी महापौरपदाचा उमेदवार बदलला आहे.


सम्बन्धित सामग्री