पुणे: भरधाव कारने बारा जणांना उडवल्याची संतापजनक घटना घडली आहे. पुण्यातील भावे हायस्कूल जवळची ही घटना आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
पुण्यातून सातत्याने धक्कादायक प्रकार उघड होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता एका कारने बारा जणांना उडवले आहे. भावे हायस्कूलच्या जवळ हा प्रकार घडला आहे. बाराही जखमींवर संचेती आणि मोडक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जयराम शिवाजी मुळे असं कारचालकाचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. कारचालकाचं वय 27 वर्षं आहे. 27 वर्षीय जयराम मुळे याने भरधाव वेगाने कार चालवत बारा जणांचा बळी घेण्याचा प्रयत्न केला आहे. जयराम हा पुण्यातील समर्थ नगर कॉलनी बिबेवाडी येथे राहतो.
हेही वाचा : अवकाळी पावसाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान; सुमारे 680 गावांना अतिवृष्टीचा तडाखा
पुण्यातील भावे हायस्कूल जवळ कारने बारा जणांना उडवले आहे. कारच्या धडकेत बारा जण गंभीर जखमी आहेत. बाराही जण एमपीएससीचे विद्यार्थी असल्याची माहिती मिळत आहे. तसेच त्यांच्यावर पुण्यातील संचेती व मोडक रुग्णालयात उपचार सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे.