गोंदियात भरधाव ट्रकने 35 वर्षीय तरुणाला चिरडले; संतप्त नागरिकांचा महामार्गावर ठिय्या

गोंदिया बालाघाट महामार्गावरील नागरा येथे भरधाव ट्रकने एका 35 वर्षीय तरुणाला चिरडल्याची घटना घडली आहे.
gondia balaghat highway
gondia balaghat highway

गोंदिया : गोंदिया बालाघाट महामार्गावरील नागरा येथे भरधाव ट्रकने एका 35 वर्षीय तरुणाला चिरडल्याची घटना घडली आहे. लोकेश बघेले असे मृतक तरुणाचे नाव आहे. घटनेनंतर नागरा येथील नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या मांडला आहे. सध्या या महामार्गाचे बांधकाम सुरू असून बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व्यवस्था न केल्यामुळे यापूर्वी झालेल्या अपघातात 6 लोकांचा मृत्यू झाला. आज पुन्हा एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून बांधकाम करणाऱ्या कंपनीचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी यावे. अन्यथा हे आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे.

हेही वाचा : पैठणमध्ये एसटी बस-दुचाकीची भीषण धडक; दोन जणांसह अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version