सांगली: सांगली येथील पलूस तालुक्यातील अमनापूर वेताळपेठ येथील छायाचित्रकार आनंदा राडे यांच्या स्टुडिओमध्ये एका दुर्मिळ पांढऱ्या बेडकाचा शोध लागल्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. पांढऱ्या रंगाचा हा दुर्मिळ बेडूक आनंदा राडे यांनी पाहिला. विशेषतः या बेडकाला 'झाड बेडूक' असेही म्हणतात. याबाबत आंबोलीतील अभ्यासक काका भिसे यांच्याकडून या प्रजातीची खात्री करण्यात आली होती. यादरम्यान, दुर्मीळ पांढरा बेडूक झाडावर किंवा भिंतीवर चढतो. जास्त पाऊस झाल्यावर हा बेडूक बाहेर पडतो. त्यानंतर तो झाडावर आणि भिंतीवर चढतो. हा दुर्मिळ पांढरा बेडूक नैसर्गिकरीत्या पांढरा असतो.
हेही वाचा: मी मध्यस्थी केली असं म्हणणार नाही; मध्यस्थीच्या वक्तव्यावरून ट्रम्प यांचा यु-टर्न
राडेंनी या बेडकाला नैसर्गिक अधिवासात सोडले:
1830 मध्ये जॉन अँडवर्ड ग्रे यांनी क्वचितच आढळणाऱ्या इंडियन कॉमन ट्री प्रजातीच्या दुर्मीळ बेडकाची प्रथमच जगाला ओळख करून दिली होती. हा बेडूक दक्षिण आशियामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो. तसेच, कोंकणसह अतिवृष्टीच्या ठिकाणीही जास्त आढळतो. या बेडकाला 'चुनाम' या नावानेही ओळखले जाते. तर संस्कृतमध्ये याला 'चूर्ण' असेही म्हटले जाते. एखाद्या ठिकाणी किंवा जिथे ओलावा असेल तिथे विशेषतः या बेडकाच्या झाडावरील पायाच्या बोटा एका प्लेटसारख्या असतात, जे टोकाकडे रुंद होतात. बेडकाच्या पायांच्या आतील बाजूस गडद पट्टे असतात. जेव्हा बेडूक उडी मारतो तेव्हा ते चमकतात आणि स्वतःचा बचाव करतात. म्हणून, अशा बेडकांची उपस्थिती त्या भागात चांगल्या पर्यावरणीय गुणवत्तेचे लक्षण आहे. कीटक आणि कृमी हे त्याचे अन्न आहे, आणि हे बेडूक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे असे बेडूक आढळणे त्या परिसरातील पर्यावरणीय गुणवत्ता चांगली असल्याचे द्योतक आहे.