”दुपारपर्यंत वाट पाहणार अन्यथा…”; अभिजीत दिपकेंच्या आई-वडिलांनी स्पष्ट केली भूमिका

Abhijit Dipke : दिल्लीतील जंतर-मंतरवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन पुकारले आहे. आंदोलनापूर्वी ध्रुव राठी, अभिजीत दिपके आणि अन्य दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. यानंतर अभिजीत दीपके यांच्या आई-वडिलांनी सरकारवर टीका करत प्रतिक्रिया दिली.
”दुपारपर्यंत वाट पाहणार अन्यथा…”; अभिजीत दिपकेंच्या आई-वडिलांनी स्पष्ट केली भूमिका

दिल्लीमधील जंतर-मंतर येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीने आज आंदोलन पुकारले होते. मात्र, आंदोलन सुरु होण्यापूर्वीच या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे. प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी यांच्यासह आता अभिजीत दीपके आणि आणखी दोघांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दिल्लीला जाण्यासाठी विमानात असताना, त्यातही प्रवाशांची गर्दी असतानाच पोलिसांनी विमानात प्रवेश करुन त्यांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती समोर आलेली आहे. या प्रकारानंतर अभिजीत दीपके यांच्या आई-वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे. अभिजीत दीपके यांच्या आईने सरकारवर टीका करत आक्रमक भूमिका मांडली आहे, तर त्यांच्या वडिलांनी देखली सरकाराला खडे बोल सुनावले. नेमकं काय म्हणाले अभिजीत दीपके यांचे आई-वडील? पाहा त्यांच्या पहिल्या प्रतिक्रीया

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version