Wednesday, June 18, 2025 03:11:48 PM

देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांचा अपघात; कारमधील 8 जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगरहून पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांच्या कारचा अपघात झाला आहे. या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत.

देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांचा अपघात कारमधील 8 जण गंभीर जखमी

विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरहून पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांच्या कारचा अपघात झाला आहे. या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री येथे दुभाजकाला धडकून हा अपघात झाला. यात कारमधील 8 जण गंभीर जखमी झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तांबे कुटुंबीय पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जात असताना धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्रीजवळ पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनाने समोर असणाऱ्या कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कारचालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला. ही कार महामार्गाच्या आजूबाजूला धडकून कारमधील आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर पाचोड आणि छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : Buldhana: पुराच्या पाण्यात 70 वर्षीय आजोबा गेले वाहून

अपघातात जखमी झालेले नागरिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तांबे डोणगाव येथे राहतात. सध्या त्यांना पाचोड आणि छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

अपघातातील जखमींची नावे
हौसाबाई हरिश्चंद्र तांबे, (वय 70)
कौशल्या भिमराव जाधव (वय 70)
मिरा रमेश लहाणे (वय 40)
प्रेरणा रमेश लहाणे (वय 20 )
सरला विष्णू तांबे (वय 30)
भाग्यश्रीबाई कल्याण तांबे (वय 68)
वैभव विष्णू तांबे (वय 18)
वृषाली विष्णू तांबे, (वय 17)


याविषयी अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील तांबे डोणगाव येथील तांबे दाम्पत्य हे मागील काही वर्षांपासून नोकरी निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास आहे. बुधवारी सकाळी तांबे आणि लहाणे दाम्पत्य हे एअरटीका (एम एच 20.जीई.3724) कारमधून पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जात असताना धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्रीजवळ पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनाने समोर असणाऱ्या कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कारचालकाचे नियंत्रण सुटून ही कार महामार्गाच्या दुभाजकाला धडकून कारमधील आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना कारबाहेर काढून खाजगी वाहनाद्वारे तातडीने पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. आसाराम चौरे यांनी ताबडतोब जखमींवर प्राथमिक उपचार सुरू केले. सर्व जखमींना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आहे. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


सम्बन्धित सामग्री