Saturday, June 14, 2025 03:58:31 AM

Buldhana: पुराच्या पाण्यात 70 वर्षीय आजोबा गेले वाहून

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात घारोड गावात आलेल्या पुरामुळे 70 वर्षीय व्यक्ती वाहून गेला आहे. रात्रीपासून गावकऱ्यांनी या व्यक्तीचा शोध घेतला मात्र अद्यापही सापडलेला नाही.

buldhana पुराच्या पाण्यात 70 वर्षीय आजोबा गेले वाहून

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात घारोड गावात आलेल्या पुरामुळे 70 वर्षीय व्यक्ती वाहून गेला आहे. रात्रीपासून गावकऱ्यांनी या व्यक्तीचा शोध घेतला मात्र अद्यापही सापडलेला नाही. अचानक आलेल्या पुरामुळे गावातील काही दुचाक्या देखील वाहून गेल्या आहेत. प्रशासनाला माहिती देऊन देखील अद्याप कुठलाही कर्मचारी अधिकारी या ठिकाणी आलेला नाही. धोंडव इंगळे असं वाहून जाणाऱ्या व्यक्तीचं नाव असून गावकऱ्यांकडून त्याचा शोध सुरू आहे.

मुसळधार पावसामुळे घारोड गावात पूर आला आहे. बुलढाण्यातील ही घटना आहे. पुराच्या पाण्यात 70 वर्षीय व्यक्ती वाहून गेला आहे. गावकऱ्यांनी त्याचा शोध सुरु केला असून अद्याप त्यांना यश मिळालेलं नाही. धोंडव इंगळे नामक व्यक्ती वाहून गेला असून तो अजून सापडलेला नाही. 

हेही वाचा : Mumbai Weather: आज मुंबईत मुसळधार पाऊस पडेल का?, आयएमडीने वर्तवला हवामान अंदाज

मुसळधार पावसात 70 वर्षीय आजोबा गायब 
बुलढाण्याती घारोड गावात पडलेल्या मुसळधार पावसात 70 वर्षीय आजोबा गायब झाले आहेत. पुराच्या पाण्यात आजोबा वाहून गेल्याची शक्यता आहे. कारण गावकऱ्यांनी सगळीकडे शोधूनही ते सापडले नाहीत. धोंडव इंगळे असं वाहून गेलेल्या आजोबांचे नाव आहे. संपूर्ण गाव आजोबांच्या चिंतेत आहे. आजोबा अजूनही सापडले नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांनी सगळीकडे शोधाशोध सुरु केली आहे. मात्र आजोबांचा काही ठाणपत्ता लागलेला नाही. रात्री झालेल्या मुसळधार पावसाने गावाला पूर आला आणि त्या पुरात गावातील काही दुचाकी वाहने देखील वाहून गेल्याची माहिती घारोड गावातील ग्रामस्थांनी दिली आहे.  


सम्बन्धित सामग्री