Saturday, March 07, 2026 04:58:25 AM

Palghar Highway Accident : थोडक्यात बचावलं नाही तर..., भरधाव ॲसिडचा टँकर थेट हॉटेलमध्ये शिरला; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

palghar highway accident  थोडक्यात बचावलं नाही तर भरधाव ॲसिडचा टँकर थेट हॉटेलमध्ये शिरला मुंबई-अहमदाबाद महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. हायड्रोक्लोराइड लिक्विड वाहतूक करणारा भरधाव टँकर थेट हॉटेलमध्ये शिरला असल्याची अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. टँकर चालक मद्यप्राशन करून नशेत असल्याचा प्राथमिक अंदाज दर्शवण्यात येतो आहे. तसेच टँकरचा वेग प्रचंड होता आणि चालकाचे वाहनावर अजिबात नियंत्रण नव्हते. अपघातामुळे मार्गावर वाहतुकीला तात्पुरता अडथळा निर्माण झाला होता आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा- T20 World Cup 2026 IND vs PAK: पाकिस्तानने शरणागती पत्करली! पीसीबीची अट फेटाळत भारत-पाकिस्तान सामन्याबाबत आयसीसीने घेतला मोठा निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, हा टँकर मुंबईच्या दिशेने जात होता. चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने हा टँकर महामार्गालगत असलेल्या हॉटेलच्या पार्किंग तोडून थेट आत घुसला. टँकरमध्ये अत्यंत घातक असे हायड्रोक्लोरिक ॲसिड भरलेले होते. सुदैवाने, टँकरचा टँक फुटला नाही किंवा कोणतीही गळती झाली नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. मात्र टँकरच्या धडकेमुळे हॉटेलच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी हॉटेलच्या त्या भागात लोकांची वर्दळ कमी होती. ज्यामुळे जीवितहानी टळली. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, अपघाताचे दृश्य पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.


सम्बन्धित सामग्री