अजित पवारांचे काही दिवसांपूर्वी विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याच्या सर्वच स्तरात दुःखाची लाट उसळली. त्यांचे लाखो समर्थक, सर्वपक्षीय नेते यांच्या उपस्थितीत 29 जानेवारीला अजित पवारांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अजित दादांच्या मृत्यूच्या धक्क्यातून महाराष्ट्र अजूनही सावरत असतानाच पुणे महानगरपालिकेचा एक अजब निर्णय समोर येत आहे. अजित दादांच्या यांच्या निधनाला अद्याप दहा दिवसही पूर्ण झाले नसताना पुणे महानगरपालिकेने एक अजब निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. 15 तारखेला महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या निर्णयाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा - WPL 2026 Final : स्मृतीच्या बॅटमधून तुफानी इनिंग! फायनलमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत केला रेकॉर्ड्सचा पाऊस
काय आहे परिपत्रकात?
कामगार कल्याण विभाग,
पुणे महानगरपालिका.
जावक क्र. एलओ / 8006 दिनांक : 03/02) 202E
विषय - दिनांक 15 फेब्रुवारी, 2026 पुणे महानगरपालिका वर्धापन दिन पुणे महानगरपालिका सांस्कृतिक कलामंचातर्फे आयोजित कार्यक्रम
पुणे महानगरपालिका सांस्कृतिक कलामंचातर्फे दि.15 फेब्रुवारी, 2026 पुणे महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त अधिकारी/सेवकांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये नृत्य (वैयक्तिक व समुहनृत्य), नाटक, ऑर्केस्ट्रा (हिंदी व मराठी गितांचा कार्यक्रम), वादन, वैयक्तिक कलागुण व छायाचित्र / हस्तचित्र/ कलाकृती प्रदर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
हेही वाचा - WPL 2026 Final : स्मृतीच्या बॅटमधून तुफानी इनिंग! फायनलमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत केला रेकॉर्ड्सचा पाऊस
तरी, ज्या अधिकारी/सेवकांना वर नमूद केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावयाचा असेल त्यांनी दिनांक 10/02/2026, सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपली नावे कामगार कल्याण विभागाकडे खालील तक्त्यामध्ये पाठवावित. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
