Saturday, February 14, 2026 01:12:34 PM

Ajit Pawar Death : 66 वर्षे, 6 महिने आणि 6 दिवस..., अजित पवारांच्या बाबतीत दुर्दैवी आकड्यांचा योगायोग समोर

अजित पवार बारामतीकडे येत असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाल्याने यात त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर अजित पवारांच्या आयुष्याशी संबंधित काही दुर्दैवी योगायोग चर्चेचा विषय ठरत आहेत.

ajit pawar death  66 वर्षे 6 महिने आणि 6 दिवस अजित पवारांच्या बाबतीत दुर्दैवी आकड्यांचा योगायोग समोर

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीकडे येत असताना पुणे–बारामती परिसरात त्यांच्या विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात असून, त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी पसरल्याने राज्यभर शोककळा पसरली आहे. राजकारणात नेहमी ठाम भूमिका घेणारे, बुलंद आवाज, रोखठोक व्यक्तिमत्व, पुण्याचे पालकमंत्री अशी ओळख असणार महाराष्ट्र राज्यचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विमान अपघातात अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर अजित पवारांच्या आयुष्याशी संबंधित काही दुर्दैवी आकड्यांचे योगायोग चर्चेचा विषय ठरत आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी झाला असून 28 जानेवारी 2026 रोजी हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या हिशोबाने त्यांचे वय 66 वर्षे, 6 महिने आणि 6 दिवस इतके ठरते. विशेष म्हणजे ते आतापर्यंत सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. यामुळे हा योगायोग महत्त्वाचा ठरत आहे. 
हेही वाचा- Ajit Pawar Death : अजित पवारांच्या निधनाच्या बातमीनंतर काका शरद पवार तातडीने बारामतीत दाखल; विमान अपघाताची A टू Z माहिती घेतली

नेमकं काय घडलं?
आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात होऊन त्यांच्यासह विमानातील सर्वजण मृत्युमुखी पडले. विमान वाहतूकतज्ज्ञ नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचे विमान सकाळी 9:00 वाजताच्या सुमारास बारामतीमध्ये लँडिंग करत होते. त्या वेळी परिसरात धुक्यामुळे व्हिजिबिलिटी (दृश्यमानता) काही प्रमाणात कमी होती. वैमानिकाने पहिल्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी न झाल्याने त्याने 'गो राऊंड' घेण्याचा निर्णय घेतला. 'गो राऊंड' म्हणजे धावपट्टीला स्पर्श करण्यापूर्वी पुन्हा आकाशात उड्डाण करून लँडिंगसाठी फेरचक्र मारणे. दुर्दैवाने, दुसऱ्या प्रयत्नात धावपट्टी क्रमांक 19 वर येण्यापूर्वीच विमानाचा अपघात झाला.
यावेळी अजित पवारांसोबत त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, अनुभवी पायलट सुमित कपूर आणि शांभवी पाठक उपस्थित होते.

अपघाताचा क्रम काय? 
बारामती विमानतळ लहान आहे आणि त्यावर ILS (इंस्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम) सुविधा नाहीत. 
तर पुणे-बारामती परिसरात दाट धुके, दृश्यमानता अत्यंत कमी असल्यामुळे वैमानिकाला मॅन्युअल आणि व्हिज्युअल लँडिंगचा प्रयत्न करावा लागला. 
विमान थेट धावपट्टीजवळ पोहोचले नाही परंतु विमानाने मोठे वळण घेतले. यावरून असे दिसून आले की लँडिंगचा पहिला प्रयत्न रद्द करण्यात आला. 
पुणे-बारामती परिसरात दाट धुके असल्यामुळे पायलटला धुक्यात धावपट्टीशी जुळवून घेणे कठीण झाले. त्यामुळे दुसरा लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला. यादरम्यान, वैमानिकाने MAYDAY कॉल जारी केला. 
डीजीसीएच्या सूत्रांनुसार, हा टेबल-टॉप धावपट्टी आहे. लँडिंग दरम्यान, विमान धावपट्टीच्या कडेला कोसळले. सुमारे 100 फूट उंचीवर विमानाचे संतुलन बिघडले. 
रनवेवर पोहोचण्यापूर्वी विमान जमिनीवर आदळले. आघात होताच, एक मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले. 
विमानात मोठी आग लागली. आगीमुळे, तात्काळ बचाव शक्य झाला नाही. दुर्घटनेची चौकशी सुरू आहे; अंतिम कारण डीजीसीएच्या अहवालात निश्चित केले जाईल.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या