Saturday, February 14, 2026 04:03:54 AM

Ajit Pawar Death : अजित पवारांच्या निधनाच्या बातमीनंतर काका शरद पवार तातडीने बारामतीत दाखल; विमान अपघाताची A टू Z माहिती घेतली

उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमध्ये येत असताना त्यांचा पुणे-बारामती या परिसरात विमान अपघात झाला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची बातमी कळताच काका शरद पवार हे थेट बारामतीत घटनास्थळी दाखल झाले.

ajit pawar death  अजित पवारांच्या निधनाच्या बातमीनंतर काका शरद पवार तातडीने बारामतीत दाखल विमान अपघाताची a टू z माहिती घेतली

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमध्ये येत असताना त्यांचा पुणे-बारामती या परिसरात विमान अपघात झाला, ज्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांचे दुर्दैवी निधन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. दरम्यान अपघाताची बातमी कळताच अजित पवारांचे काका शरद पवार हे थेट बारामतीत घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटना घडली त्यावेळेस शरद पवार हे नवी दिल्ली येथे होते. त्यानंतर ते अपघात स्थळी पोहोचताच अजित पवारांचा मृत्यू कसा झाला याची दखल यावेळी शरद पवारांनी घेतली. रन वेवर असतानाच शरद पवारांनी ही माहिती घेतली.

शरद पवारांना कशी समजली दादांच्या निधनाची बातमी?

अजित पवारांच्या अपघाताची माहिती देण्यापुर्वी शरद पवार यांना ब्रीज कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना अजित पवारांच्या मृत्यूची बातमी देण्यात आली. बारामतीत पोहोचताच शरद पवारांनी घेतली विमान अपघाताची सविस्तर माहिती घेतली. अजित पवारांच्या अकाली जाण्यामुळे शरद पवार यावेळी काहीसे भावुक झाल्याचं दिसून आलं. यावेळी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या अश्रूचा बांध फुटल्याचं दिसून आलं. अजित पवारांचा पार्थिव संध्याकाळी पाच वाजल्यापासून अंत दर्शनासाठी ठेवण्यात येईल. उद्या सकाळी 9 वाजता अंत यात्रा निघेल तर अंत्य संस्कार 11 वाजता विद्या प्रतिष्ठान मैदानात होईल. 

हेही वाचा- Ajit Pawar Plane Crash : विमान लॅंडिंगचा पहिला प्रयत्न झाला, पण दुसरा प्रयत्न फसला!; अपघाताबाबतची ही चकीत करणारी माहिती समोर
नेमकं काय घडलं?
आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात होऊन त्यांच्यासह विमानातील सर्वजण मृत्युमुखी पडले. विमान वाहतूकतज्ज्ञ नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचे विमान सकाळी 9:00 वाजताच्या सुमारास बारामतीमध्ये लँडिंग करत होते. त्या वेळी परिसरात धुक्यामुळे व्हिजिबिलिटी (दृश्यमानता) काही प्रमाणात कमी होती. वैमानिकाने पहिल्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी न झाल्याने त्याने 'गो राऊंड' घेण्याचा निर्णय घेतला. 'गो राऊंड' म्हणजे धावपट्टीला स्पर्श करण्यापूर्वी पुन्हा आकाशात उड्डाण करून लँडिंगसाठी फेरचक्र मारणे. दुर्दैवाने, दुसऱ्या प्रयत्नात धावपट्टी क्रमांक 19 वर येण्यापूर्वीच विमानाचा अपघात झाला.
यावेळी अजित पवारांसोबत त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, अनुभवी पायलट सुमित कपूर आणि शांभवी पाठक उपस्थित होते.

हेही वाचा- Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांचे विमान उडवणाऱ्या वैमानिकांना किती अनुभव होता? विमान कोणत्या कंपनीचे?

अपघाताचा क्रम काय? 
बारामती विमानतळ लहान आहे आणि त्यावर ILS (इंस्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम) सुविधा नाहीत. 
तर पुणे-बारामती परिसरात दाट धुके, दृश्यमानता अत्यंत कमी असल्यामुळे वैमानिकाला मॅन्युअल आणि व्हिज्युअल लँडिंगचा प्रयत्न करावा लागला. 
विमान थेट धावपट्टीजवळ पोहोचले नाही परंतु विमानाने मोठे वळण घेतले. यावरून असे दिसून आले की लँडिंगचा पहिला प्रयत्न रद्द करण्यात आला. 
पुणे-बारामती परिसरात दाट धुके असल्यामुळे पायलटला धुक्यात धावपट्टीशी जुळवून घेणे कठीण झाले. त्यामुळे दुसरा लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला. यादरम्यान, वैमानिकाने MAYDAY कॉल जारी केला. 
डीजीसीएच्या सूत्रांनुसार, हा टेबल-टॉप धावपट्टी आहे. लँडिंग दरम्यान, विमान धावपट्टीच्या कडेला कोसळले. सुमारे 100 फूट उंचीवर विमानाचे संतुलन बिघडले. 
रनवेवर पोहोचण्यापूर्वी विमान जमिनीवर आदळले. आघात होताच, एक मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले. 
विमानात मोठी आग लागली. आगीमुळे, तात्काळ बचाव शक्य झाला नाही. दुर्घटनेची चौकशी सुरू आहे; अंतिम कारण डीजीसीएच्या अहवालात निश्चित केले जाईल.
 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या