अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी दोन भावांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमागचं नेमकं कारण काय? कट कसा रचला गेला आणि पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा उलगडा कसा केला, जाणून घ्या सविस्तर.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर येथील गणेश मच्छिंद्र गायकवाड हा तरुण शिंगवे नाईक एका विवाहित महिलेचा घरी गेला होता. हीच गोष्ट महिलेचा पती महेश राजेंग्र जाधव याला समजली होती. आपण घरी नसताना गणेश घरी गेल्याने महेश संतापला. त्यानंतर संतापलेल्या महेश आणि त्याचा भाऊ योगेश राजेंद्र जाधव यांनी गणेशला बेदल मारहाण केली. याच मारहाणीमध्ये गणेशचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा- रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपायाला शिवीगाळ करत मारहाण; नेमकं प्रकरण काय?
आरोपींनी हत्या लपवण्यासाठी पुरावाच नष्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. तरुणाचा मृतदेह हा मुळा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये फेकून दिल्याची कबुलीही आरोपींनी दिली आहे. एमआयडीसी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत ओळख पटवली असता तो श्रीरामपूरमध्ये वास्तव्यास असलेल्या गणेश गायकवाडचाच असल्याचे समोर आले.
तपासात काय समोर आलं?
याप्रकरणी मृत तरुणाचा भाऊ मच्छिंद्र गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिंगवे नाईक येथील महेश जाधव तसेच योगेश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हेमंत थोरात करत आहेत. पोलिस तपासानंतर या हत्येमागील नेमके कारण कारण काय स्पष्ट होणार आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update