Wednesday, July 09, 2025 10:17:46 PM

सकाळी 11 वाजता शेवटचा कॉल अन्...एअर होस्टेस मैथिली पाटीलचा विमान अपघातात मृत्यू

अहमदाबाद विमान दुर्घटनेत पनवेलच्या न्हावा गावातील हवाई सुंदरी मैथिली पाटीलचा दुर्दैवी मृत्यू. दोन वर्षांपासून एअर इंडियामध्ये कार्यरत. अखेरचा संवाद सकाळी आईसोबत झाला.

सकाळी 11 वाजता शेवटचा कॉल अन्एअर होस्टेस मैथिली पाटीलचा विमान अपघातात मृत्यू

पनवेल: अहमदाबादमध्ये घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेत पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील रहिवासी आणि एअर इंडियाची हवाई सुंदरी मैथिली मोरेश्वर पाटील (वय अंदाजे 24) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मैथिली मागील दोन वर्षांपासून एअर इंडिया कंपनीत क्रू मेंबर मध्ये हवाई सुंदरी म्हणून कार्यरत होती. तिची ड्युटी अपघातग्रस्त झालेल्या अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या फ्लाइट AI-171 मध्ये होती.

मैथिली 11 जून दुपारी एक वाजता आपल्या कुटुंबासोबत दुपारचे जेवण करून घरातून ड्युटीसाठी निघाली होती. ती न्हावा गावातून मुंबई विमानतळावर गेली आणि तेथून अहमदाबादच्या दिशेने उड्डाण केले. 12 जून सकाळी 11 वाजता तिचा आपल्या आई-वडिलांशी शेवटचा फोनवर संपर्क झाला. त्या नंतर काही वेळातच विमान टेकऑफनंतर काही मिनिटांतच कोसळले आणि या भीषण दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा: Ahmedabad Plane Crash: बदलापूरमधील क्रू मेंबर दीपक पाठकचा दुर्दैवी मृत्यू

मैथिलीच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, तिची आई, मामा आणि भाऊ तात्काळ अहमदाबादला रवाना झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थ, नातेवाईक व मित्रांनी तिच्या कुटुंबाला धीर देण्यासाठी न्हावा येथील घरी गर्दी केली आहे.

ही दुर्घटना संपूर्ण पनवेल तालुक्यासाठी अत्यंत दु:खद आणि धक्कादायक ठरली आहे. आपल्या सेवेत समर्पित असलेल्या तरुणीचा असा अंत होणं हे कधीच भरून न निघणारे नुकसान मानले जात आहे.

हेही वाचा: Ahmedabad Plane Crash: ज्योतिषीची भविष्यवाणी खरी ठरली? अहमदाबाद विमान अपघातानंतर चर्चेला उधाण
 


सम्बन्धित सामग्री