Ajit Pawar On Reservation: ‘ज्याला गरज त्यालाच आरक्षण, राजकारण थांबवा’; अजित पवारांचं स्पष्ट वक्तव्य

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण आणि ठाम भूमिका मांडली आहे.

Ajit Pawar On Reservation: ‘ज्याला गरज त्यालाच आरक्षण, राजकारण थांबवा’; अजित पवारांचं स्पष्ट वक्तव्य

बीड: राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा सर्वाधिक चर्चेत आहे. मराठा समाजाच्या आंदोलनांपासून ते इतर मागासवर्गीयांच्या मागण्या अशा विविध पातळ्यांवर आरक्षणाचे स्वरूप काय असावे यावर चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बीड येथे बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण आणि ठाम भूमिका मांडली आहे.

अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, आरक्षण हा विषय केवळ जाती-धर्माच्या चौकटीतून बघू नये. उलट प्रत्येकाला त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार आणि खऱ्या गरजेनुसार आरक्षण मिळालं पाहिजे. 'ज्याला त्याच्या मागणीप्रमाणे आणि आर्थिक स्थितीप्रमाणे आरक्षणाची आवश्यकता असेल, त्याला आमचा कुठलाही विरोध नाही. पण यामागे काहीजण राजकारण करण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांना थांबवणं आवश्यक आहे,' असं ते म्हणाले.

जाती-धर्मापलीकडील भूमिका

अजित पवार म्हणाले की, 'राजकारण करताना मी कधीही जात-पात, नातेसंबंध किंवा गोत्यांचा विचार करत नाही. मी फक्त माणूस पाहतो आणि त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो. काही लोक समाजात जातिवादाचं खूळ पेरून तेढ निर्माण करत आहेत, जे चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आपण त्या विचारांचा आदर करायला हवा.'

हेही वाचा: Devendra Fadanvis On Heavy Rain In Marathwada: मराठवाड्यातील अतिवृष्टीचं कारण काय?, फडणवीस म्हणाले…

त्यांनी पुढे सांगितलं की, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आपण चालत आहोत. समाजात कोणी चुकीचं डोक्यात भरण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला स्पष्टपणे सांगायला हवं की आपण सारे हाडामासाचे माणूस आहोत आणि सगळ्यांचं रक्त लालच आहे. त्यामुळे जातीच्या नावाने लोकांना भडकावणं थांबलं पाहिजे.'

सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य

याआधी खासदार सुप्रिया सुळे यांनी एका चॅनेलला दिलेल्या  मुलाखतीत आरक्षणाबाबत स्वतःची भूमिका स्पष्ट केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, आरक्षण त्यांनाच मिळालं पाहिजे ज्यांना त्याची खरी आवश्यकता आहे. 'मी आरक्षणाची मागणी करू शकत नाही कारण माझे पालक सुशिक्षित आहेत, मी आणि माझी मुलंही सुशिक्षित आहोत. जर मी आरक्षणासाठी अर्ज केला तर मला स्वतःला लाज वाटेल. आरक्षण हे त्या लोकांसाठी आहे ज्यांना संधी मिळाली नाही, जे मागासलेले आहेत,' असे सुळे यांनी म्हटले होते.

या वक्तव्यांनंतर अजित पवारांनीही समान धाग्यावर प्रतिक्रिया देत आर्थिक स्थिती हा महत्त्वाचा घटक असल्याचं अधोरेखित केलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number