Saturday, February 14, 2026 04:27:55 AM

Ajit Pawar Memories: गुलाबी जॅकेट, नवी स्टाईल; अजितदादांच्या 'या' लुकने सगळ्यांनाच भुरळ घातली

अजितदादा म्हणजे कामाचा डोंगर. 'लोकांसाठी काम करायचं' हा एकच ध्यास घेतलेले हे व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही.

ajit pawar memories गुलाबी जॅकेट नवी स्टाईल अजितदादांच्या या लुकने सगळ्यांनाच भुरळ घातली

पुणे: पहाटेचे साडेचार वाजलेले... बारामतीच्या रस्त्यांवर रात्रीची शांतता दिसायची. मात्र दादांच्या घरात दिवसरात्र उजेड असे. फाईल्सचा ढिगारा, हातात पेन आणि समोर राज्याच्या विकासाचा नकाशा... हे चित्र महाराष्ट्रासाठी नवीन नाही. पण आज अजितदादा पवार यांच्या निधनाने त्याच चित्राला संघर्षाची एक भावूक किनार लाभली आहे.

नात्यांच्या उंबरठ्यावर राजकारणाचे रणकंदन

काळाच्या ओघात अनेक वादळं आली आणि गेली, पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीने 'दादां'च्या आयुष्यात असं एक वादळ आणलं, ज्याने घराची फाळणी केली. रक्ताची नाती जेव्हा राजकारणाच्या पटावर आमनेसामने उभी ठाकली, तेव्हा शब्दांपेक्षा मौनच जास्त बोलू लागलं. 'राष्ट्रवादी'तील ती फूट केवळ पक्षाची नव्हती, तर ती काळजाच्या दोन तुकड्यांची होती. 

गुलाबी रंगाची साद: एक भावनिक 'मेकओव्हर'

या सगळ्यात हारतील ते अजित पवार कसे? पराभवाच्या राखेतून पुन्हा उभारी घेण्यासाठी त्यांनी स्वतःला बदललं. 'डिझाइनबॉक्स'च्या कल्पकतेतून दादांच्या आयुष्यात 'गुलाबी' रंग अवतरला. पांढऱ्या शुभ्र कुर्त्यावरचं ते गुलाबी जॅकेट आणि 'लाडक्या बहिणीं'साठी असलेला जिव्हाळा... दादांचा हा नवा अवतार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. 'जनसन्मान यात्रे'च्या निमित्ताने त्यांनी गावोगावी भगिनींच्या ओवाळणीचा स्वीकार केला. प्रत्येक सभेत ते 'लाडके दादा' म्हणून वावरले. त्यांच्या त्या हसऱ्या चेहऱ्यामागे पराभवाची जखम भरून काढण्याची एक अतोनात धडपड होती.

हेही वाचा: Ajit Pawar Last Rites in Baramati : अजित पवारांना आज अखेरचा निरोप! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राहणार उपस्थित

थांबलेला तो पहाटेचा प्रवास

अजितदादा म्हणजे कामाचा डोंगर. "लोकांसाठी काम करायचं" हा एकच ध्यास घेतलेले हे व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही. सकाळच्या दौऱ्यात लोकांच्या गर्दीत मिसळणारा हा लोकनेता जेव्हा शांतपणे विचार करत असायचा, तेव्हा त्यांच्या त्या गुलाबी जॅकेटवर पडलेली संघर्षाची सावली स्पष्ट दिसायची. राजकारण येतं आणि जातं, सत्तेची समीकरणं बदलतात; पण जनतेच्या दिलेले अपार प्रेम दादांच्या या प्रवासाला एका भावूक वळणावर घेऊन आली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील हे 'गुलाबी झंझावात' शांत झाले आहे. अजितदादांच्या पहाटेच्या त्या पहिल्या किरणांसारखी जिद्द पुन्हा एकदा नव्या उमेदीने उजळून निघणे कठीण असल्याचे कार्यकर्ते सांगतात.

हेही वाचा: Ajit Pawar Funeral: दादांच्या अंत्ययात्रेसाठी फुलांनी सजवलेला रथ, अश्रूंनी ओथंबलेली बारामती; अजित पवारांना आज अखेरचा निरोप


सम्बन्धित सामग्री






ताज्या बातम्या




ताज्या बातम्या