Sunday, February 15, 2026 08:04:30 AM

Sharad Pawar and Parth Pawar : आजोबांची टर्म संपली, आता नातवाची इनिंग सुरू ?, पार्थ पवारांची मोठी उडी; या पदासाठी नाव आघाडीवर

sharad pawarparth pawar  आजोबांची टर्म संपली आता नातवाची इनिंग सुरू  पार्थ पवारांची मोठी उडी या पदासाठी नाव आघाडीवर

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडू लागल्या. एकीकडे अजितदादांना जाऊन काहीचं तास झालेले असताना दुसरीकडे त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आल्या. शनिवारी अजितदादांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत. मात्र विधिमंडळाच्या सदस्य होईपर्यंत तरी त्या खासदारकीचा राजीनामा देणार नाही, असे समजते. खासदारकीचा राजीनामा दिल्यावर अजित पवार यांच्या बारामती मतदार संघातून त्या विधानसभेची पोटनिवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या जागी त्यांचे पुत्र पार्थ यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. 

हेही वाचा : Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या विमान अपघातातील पायलट जिवंत ? पत्नीच्या इन्स्टाग्राम पोस्टने खळबळ

लवकरच शरद पवार यांची राज्यसभेची टर्म संपत आहे. तसेच त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याइतकं राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) कडे संख्याबळ नाही. त्यांच्या पक्षाचं विधानसभेतील संख्याबळ केवळ 10 इतकं आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांचे नातू पार्थ पवार अगदी सहज राज्यसभेवर जाऊ शकतात. येत्या 2 एप्रिलला राज्यातील 7 खासदारांची राज्यसभेची टर्म संपेल. यात राष्ट्रवादी काँग्रेस शपचे शरद पवार, फौजिया खान, शिवसेना उबाठाच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील, भाजपचे भागवत कराड, आरपीआयचे रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील यांचा समावेश आहे. विधानसभेत महायुतीचं संख्याबळ 230 च्या पुढे आहे. या सात जागांसह सुनेत्रा पवार यांच्या रिक्त जागेसाठी मतदान झाल्यास एका उमेदवाराला पहिल्या पसंतीची 33 मतं निवडून येण्यासाठी लागतील. महायुतीकडे सध्या असलेलं संख्याबळ पाहता भाजपचे 4 आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक-एक उमेदवार विजयी होऊ शकतो. याचा अर्थ पार्थ पवार अगदी सहज राज्यसभेवर जाऊ शकतो.


सम्बन्धित सामग्री