Shekh Mohsin Death: अपघात की घातपात? शिवसेना नेत्याच्या मृत्यूने घेतलं नवं वळण; माजी जिल्हाप्रमुखावर गंभीर आरोप

अकोल्यातील शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन यांच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. अपघात नसून सुनियोजित कट असल्याचा आरोप कुटुंबीयांनी करत निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे.

Shekh Mohsin Death: अपघात की घातपात? शिवसेना नेत्याच्या मृत्यूने घेतलं नवं वळण; माजी जिल्हाप्रमुखावर गंभीर आरोप

अकोला: अकोल्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेचे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन शेख समद यांच्या मृत्यू प्रकरणाने आता नाट्यमय वळण घेतले आहे. सुरुवातीला हा प्रकार रस्ते अपघात म्हणून समोर आला होता. मात्र, मृतकाच्या कुटुंबीयांनी हा अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचा गंभीर आरोप केल्याने संपूर्ण प्रकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

23 जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास अकोल्यातील नेहरू पार्क परिसरात शेख मोहसीन दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या वाहनाला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: Thackeray Brothers Rally: ठाकरे बंधूंकडून विद्यार्थी आंदोलकांसाठी विजयी रॅली! दादर पोलिसांकडून नागरिकांसाठी महत्वाची सूचना जारी

घटनेनंतर काही दिवसांनी त्यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात धक्कादायक आरोप करत हा अपघात नसल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना नियोजनबद्ध होती आणि यात शिंदे गटाचे माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांचा सहभाग असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. संबंधित व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

या मागणीसाठी मृतकाचे नातेवाईक, समर्थक आणि स्थानिक नागरिकांनी खदान पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी निष्पक्ष तपास करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी करत त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला. या घटनेमुळे अकोल्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विविध स्तरांतून या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला आहे. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून वाहनाची माहिती, प्रत्यक्षदर्शींची साक्ष आणि इतर तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत. अपघातामागे कोणताही कट होता का, की ही केवळ दुर्घटना होती, याचा उलगडा तपासानंतरच होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: Amravati News: धक्कादायक प्रकार! अचानक विद्यार्थ्यांना पोटदुखी, मळमळ, उलट्या…, अमरावतीच्या आश्रम शाळेतील बाधित विद्यार्थ्यांची संख्या वाढली

महत्त्वाचे म्हणजे, कुटुंबीयांनी केलेले आरोप अद्याप प्राथमिक स्वरूपाचे असून त्याला पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नाही. या प्रकरणातील सर्व पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सध्या शेख मोहसीन यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तपासाचा अंतिम अहवाल समोर आल्यानंतरच या गूढ प्रकरणातील सत्य स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number