राज्यातील ११ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

राज्यातील ११ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून मान्सून राज्यभरात सक्रीय झाला आहे. मराठवाडा, कोकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. याच पार्श्ववभूमीवर राज्यातील ११ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील बहुतांश भागात मान्सून सक्रिय होत आहे. सोमवारपासून कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाड्यात सर्वदूर हलका पाऊस पडत आहे. हवामान विभागाकडून बुधवारी (ता. १९) पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून अनेक ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्यता आहे. यामुळे खरिपात रखडलेल्या पेरण्यांना वेग येणार असून उगवून आलेल्या पिकांना पावसामुळे दिलासा मिळणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version