अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत महायुतीची मुसंडी; काँग्रेसला मोठा धक्का

दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील उमेदवारांमधील चुरस पाहता पुढील फेऱ्यांमध्ये मतमोजणीचे काय चित्र स्पष्ट होते, याकडे आता संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.
Amravati Constituency
Amravati Constituency

Amravati teachers constituency first round election results: अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पहिल्या फेरीचा अधिकृत निकाल जाहीर झाला असून महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी पहिल्याच फेरीत जोरदार मुसंडी मारली आहे. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात सरनाईक यांनी तब्बल 1694 मतांची दणदणीत आघाडी मिळवली आहे. दुसरीकडे, या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला अत्यंत मोठा धक्का बसला असून, त्यांच्या अधिकृत उमेदवार आदिती पोहरे थेट चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या आहेत.

शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांनी दुसरं स्थान पटकावले आहे, तर अपक्ष उमेदवार सुरेश देवकर यांनी अनपेक्षितपणे तिसऱ्या स्थानावर मजल मारली आहे.

पहिल्या फेरीची अधिकृत आकडेवारी अशी – 
किरण सरनाईक (महायुती) – 3903 मते (आघाडीवर)
श्रीकांत देशपांडे (शिवसेना बंडखोर) – 2209 मते
सुरेश देवकर (अपक्ष) – 1582 मते
आदिती पोहरे (काँग्रेस) – 1319 मते
दत्तात्रय लहाने (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 1169 मते
संगीता शिंदे (भाजप बंडखोर) – 698 मते
शेखर भोयर (भाजप बंडखोर) – 432 मते

हेही वाचा – पुणे पदवीधरमध्ये हर्षदा जाधवांची मुसंडी, तर शिक्षक मतदारसंघात ‘हा’ उमेदवार आघाडीवर

295 मते ठरली बाद; पुढील फेऱ्यांकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष
या मतमोजणीदरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली असून पहिल्या फेरीत एकूण 295 मते अवैध म्हणजेच बाद ठरली आहेत. सुरुवातीच्याच फेरीत किरण सरनाईक यांनी मिळवलेली मोठी आघाडी पाहता महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि गोटात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील उमेदवारांमधील चुरस पाहता पुढील फेऱ्यांमध्ये मतमोजणीचे काय चित्र स्पष्ट होते, याकडे आता संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – सतिश चव्हाण आपली आमदारकी राखणार? पवार आणि शिंदेंच्या उमेदवारांचं आव्हान; मतपत्रिकेचे 80 टक्के काम पूर्ण

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version