विजय चिडे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण, दिलीप घुगे आणि प्रतापसिंह पाटील यांच्यात चुरशीचा सामना रंगणार आहे. 27 ऑक्टोबरला सकाळी आठ वाजल्यापासून छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा उद्योगिक क्षेत्रात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 842 मतदान केंद्रांमधील मतमोजणीसाठी 70 टेबल मांडण्यात आल्या असून पहिला मतमोजणीच्या 13 फेऱ्या नियोजित आहेत. या निवडणुकीत 41 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
पदवीधर मतदारांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवून मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीत पदवीधरांची ताकद गृहीत धरता येणार नाही, हे मतदारांनी दाखवून दिले. पहिल्याच फेरीत मोठ्या मतांनी विजय मिळेल, असा विश्वास प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केला. पुढील दहा वर्षांत पदवीधरांसाठी काय काम करणार, याचे नियोजन जाहीरनाम्यात मांडले. विरोधी पक्षांवर टीका करण्याऐवजी स्वतःचा विकासाचा अजेंडा मतदारांसमोर ठेवला. उमेदवार पसंत पडल्याने पदवीधरांनी भरभरून मतदान केल्याचा दावा. ही निवडणूक पदवीधर मतदारांनी स्वतःच्या हातात घेतल्याचे प्रतिपादन. तब्बल 18 वर्षे पदवीधरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी काय केले, असा सवाल उपस्थित. योग्य नियोजन आणि कार्यक्रमाच्या जोरावर सर्व स्तरांतून पाठिंबा मिळाल्याचा विश्वास.
मतदानाच्या मतपत्रिकेचे 25 – 25 चे गठ्ठे करण्याचे काम 80 टक्के पूर्ण. आणखी एक तास लागेल गठ्ठे तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी. तासाभरात एक लाख 91 हजार 689 मतपत्रिकेचे गठ्ठे होणार पूर्ण. त्यानंतर साधारणपणे दीड वाजता एकत्रित केलेल्या मतपत्रिकेच्या गठ्ठ्याचे टेबलवर वितरण केले जाणार. पहिली फेरी अडीच ते तीन वाजता होईल, त्यात पहिला कल लक्षात येईल. पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणीसाठी तीन फेऱ्या होणार
विधान परिषद मतदारसंघ निकाल | Maharashtra MLC Election Results