शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निकाल | Graduates Constituency Election Results

महाराष्ट्रातील पदवीधर मतदारसंघांच्या निवडणूक निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विविध मतदारसंघांमध्ये उमेदवारांचे भवितव्य ठरणार असून, राजकीय पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीसोबत निकालाचे चित्र स्पष्ट होणार असून, पुढील घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निकाल | Graduates Constituency Election Results
graduates constituency election results 2026

LIVE NEWS & UPDATES

  • 27 Oct 2026 08:31 AM (IST)

    राज्य मंत्री मंडळाच्या दुष्काळ निवारण उपसमितीची आज बैठक

    महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.राज्यातील 304 दुष्काळी तालुक्यांमधील उपाययोजनांचा घेणार आढावा  घेणार आहे. ज्यात शेतकरी आणि शेतमजुरांसह विद्यार्थ्यांसाठी घोषित मदतीचा घेणार आढावा घेणार असून पिण्याचे आणि शेतीचे पाणी, जनावरांचा चारा उपलब्धतेबाबत महत्वाचे आदेश जारी होण्याची शक्यता आहे.

  • 27 Oct 2026 08:30 AM (IST)

    गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरात बिबट्याची दहशत

    गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरात बिबट्याची दहशत आहे. संकल्प सहनिवास, नागरी निवारा परिषद परिसरात बिबट्याचा वावर दिसून आलेला आहे. ज्यात लोकवस्तीमध्ये बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून परिसराची पाहणी सुरू आहे.

  • 27 Oct 2026 08:11 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांचे किसान सभेला चर्चेसाठी निमंत्रण

    आज सायंकाळी 4.00 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर पार पडणार बैठक. किसान सभेचे पदाधिकारी थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेने बैठकीसाठी होणार रवाना.अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोलेतून काल मुंबईच्या दिशेने निघाला आहे वाहन लॉंग मार्च

  • 27 Oct 2026 08:10 AM (IST)

    धुळ्यात भाजपवर मतदार वगळल्याचा गंभीर आरोप;

    धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून 'फॉर्म ७' चा गैरवापर करून हजारो वैध मतदारांची नावे बेकायदेशीरपणे वगळण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वतीने करण्यात आला आहे. माजी आमदार डॉ. फारुख शाह यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याप्रकरणी अप्पर तहसीलदारांना निवेदन दिले असून, अल्पसंख्याक व विशिष्ट भागातील सुमारे ३० हजार मतदारांना खोट्या कारणांवरून लक्ष्य केले जात असल्याचा दावा केला आहे.

  • 27 Oct 2026 08:07 AM (IST)

    माझे भाऊ अनिल बोंडे यांचा मला आशीर्वाद : संगीता शिंदे

    अमरावती विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतमोजणी सुरू होत आहे. त्यासाठी भाजपाच्या बंडखोर उमेदवार तथा राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे या अमरावतीच्या लोकशाही भवन मध्ये मतमोजणी प्रक्रियेसाठी दाखल झाल्या आहे. माझे भाऊ अनिल बोंडे यांचा मला आशीर्वाद आहे अशी प्रतिक्रिया भाजपच्या बंडखोर संगीता शिंदे यांनी दिली.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number