सहामाहीचा पेपर संपताच…! धुळ्यात दहावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; दुपारचा निर्णय ठरला जीवघेणा

Dhule News : धुळे जिल्ह्यातील साक्री येथे सहामाही परीक्षा संपल्यानंतर कान नदीवरील नकट्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहावीतील कृष्णा निशांत चाळसे या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. मित्रांसोबत पोहताना ही घटना घडली. त्याच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

सहामाहीचा पेपर संपताच…! धुळ्यात दहावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; दुपारचा निर्णय ठरला जीवघेणा
Dhule News

धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्री शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आलेली आहे. दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा बंधाऱ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. कृष्णा निशांत चाळसे असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो साक्री येथील शाळेमध्ये इयत्ता दहावीत शिकत होता.

दुपारी तीन वाजता मित्रांसोबत गेला
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी शाळेची सहामाही परीक्षा संपली होती. पेपर संपताच साधारण तीन वाजता कृष्णा त्याच्या मित्रांसह थेट घरी न जाता कान नदीवरील नकट्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेला. त्यानंतर तो मित्रांसोबत पाण्यात उतरला असताना काही क्षणात पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो थेट बुडू लागला.

हेही वाचा – वाशिम हादरलं! बापानेच आवळला लेकीचा गळा, अंत्यसंस्कारही उरकले; पण एका माहितीने फुटलं बिंग

मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील स्थानिक तरुणांनी धाव घेतली होती. कृष्णाला पाण्याबाहेर काढून तातडीने साक्री ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. कृष्णाच्या जाण्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.एका हुशार विद्यार्थ्याचा असा अचानक अंत झाल्याने साक्री शहरात शोककळा पसरली आहे.

 

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number