Civic Body Election 2025 : शिवसेना निवडणूक प्रभारींची घोषणा; फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची मोर्चेबांधणी

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे.

Civic Body Election 2025 : शिवसेना निवडणूक प्रभारींची घोषणा; फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची मोर्चेबांधणी

मुंबई : गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगातर्फे महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकींची घोषणा करण्यात आली. पुढील महिन्यात म्हणजे 2 डिसेंबर रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. विविध पक्षांनी आपापले उमेदवार देण्यास सुरूवात केली असून निवडणूक प्रभारींची नियुक्तीही करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेच्या (शिवसेने) वतीने नागपूर जिल्ह्यातील 15 नगरपरिषद आणि 12 नगरपंचायतीसाठी निवडणूक प्रभारींची घोषणा करण्यात आली आहे.  

हेही वाचा : Bihar Assembly Election 2025 : महाराष्ट्राचे सुपुत्र शिवदीप लांडेंना बिहारची जनता कौल देणार का? विजय शिवतारे यांच्या जावयाची कोणाशी लढत? वाचा

नागपूर जिल्ह्यातील सावनेर, हिंगणा, उमरेड, कामठी या चार विधानसभा क्षेत्रातील 7 नगरपरिषद व 9 नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी शिवसेना उपनेते कृपाल तुमाने आणि माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर रामटेक विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीची जबाबदारी अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे देण्यात आली असून काटोल विधानसभा तसेच कळमेश्वर तालुका आणि खापा नगरपरिषदेची जबाबदारी पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव यांच्यावर सोपविली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number