Devendra Fadnavis : ‘…तरीही मुंबईत मराठी माणूस संकटात का?’ फडणवीसांकडून देखील लाव रे तो व्हिडीओ म्हणत ठाकरेंना थेट सवाल

महानगपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना शिवतीर्थावर सभांचा धडाका पडत आहे. याचपापार्श्वभूमिवर ठाकरे बंधूंनंतर महायुतीची तोफ शिवतीर्थावर धडाडली आहे.

Devendra Fadnavis : ‘…तरीही मुंबईत मराठी माणूस संकटात का?’ फडणवीसांकडून देखील लाव रे तो व्हिडीओ म्हणत ठाकरेंना थेट सवाल

महानगपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना शिवतीर्थावर सभांचा धडाका पडत आहे. याचपापार्श्वभूमिवर ठाकरे बंधूंनंतर महायुतीची तोफ शिवतीर्थावर धडाडली आहे. ठाकरेंनी त्यांच्या सभेत महायुतीवर टीका करताना अनेक मुद्दे मांडले. त्यानंतर आता फडणवीसांनी लाव रे तो फोटो मधून ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस शासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांचे अदानींसोबतचे फोटो दाखवले. तसेच आकडेवारीसह गुंतवणूकीचा पाढा देखील वाचला. रोज मोदीजींना शिव्या देणाऱ्या दीदी अदानीना नमस्कार करत, वडापावच्या व्यतिरिक्त तुम्ही मराठी माणसासाठी स्वप्न पाहिलं नाही असा घणाघाती टोला फडणवीसांनी ठाकरेंना लगावला आहे. येथील सभेतून देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर, विशेषत: राज ठाकरेंवर निशाणा साधला. 

हेही वाचा- BMC : 15 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, 'दक्षता पथका'ची स्‍थापना
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कधी कधी मी विचार करतो इतक्या सभा घेण्याची गरज आहे का? जरा लाव रे तो व्हिडिओ… आज मराठी माणूस कुठं तरी अडचणीत दिसतो आहे… मग तुम्ही काय 30 वर्ष कंचे खेळत होता… अरे चुल्लू भर पाणी मे डूब मरो… मला आव्हान देतात आदित्यशी चर्चा करा,आदित्यशी चर्चा करायला आमची शीतल गंभीर पुरेशी आहे… ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची नाही,तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही,महाराष्ट्र म्हणजे मराठी जनता आहे… काही लोकांनी काल माझी नक्कल केली,नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय स्थिती झाली, काकाला किमान नक्कल आणि भाषण करता येते…. या महायुतीच्या सरकारमध्ये राज्यात फक्त मराठी सक्तीची….

हेही वाचा- Manoj Jarange Patil: मुंबईत 'जरांगे फॅक्टर' महायुतीसाठी डोकेदुखी वाढवणार, मराठ्यांचा ठाकरे बंधूंना जाहीर पाठिंबा

यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे, मातोश्री 1 वरून दोनला गेलेत का गेलेत जागा कमी पडते म्हणून? राज ठाकरे कृष्णकुंजवरून शिवतीर्थवर गेलेत, का गेलेत जागा कमी पडते म्हणून… मी तिसरं विमानतळ देखील करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळाची क्षमता मी दीड पट करणार आहे. पत्राचाळीत, बीडीडी चाळीत राहणाऱ्याला आम्ही घर देतोय. धारावीत घर देण्याचा निर्णय आम्ही घेतला. मोदींचे सरकार आल धारावीचं रिडेव्हलपलमेंट आम्ही केले. उद्धव ठाकरे तुम्ही टेंडर का रद्द केले? तुम्हाला अदानीला टेंडर द्यायचे होतं म्हणून रद्द केले होते का? धारावीची जागा आम्ही डीआरपीला दिली. सर्वात जास्त फायद्याचा ज्याने सौदा केला त्याला आम्ही टेंडर दिले. कोणी केलं मुंबईसाठी हे लोकांना माहिती आहे. विकासावर बोलायला मर्द व्हावं लागतो.  माझ्या आई वडिलांवर तुम्ही बोललात.  मी त्या बापाचा पोरगा आह.  आज माझा बाप स्वर्गातन बघत असेल तर त्यांना अभिमान वाटत असेल माझा मुलगा हिंदूत्व पुढे नेतो.  पण तुमच्या पिताश्रीना काय वाटतं असेल तुम्ही रशीद मामू सोबत आहात ते बघून. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number