लहान मुलांच्या आहाराशी संबंधित उत्पादनांच्या जाहिराती तसेच पॅकेजिंगवर आता थेट FDA ची करडी नजर असणार आहे. बेबी फूड आणि फॉर्म्युला मिल्कच्या माध्यमातून आईच्या दुधाला पर्याय असल्याचा चुकीचा संदेश जाऊ नये, त्यासाठी महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने कठोर नियम आता लागू केले आहेत. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिलेली आहे.
FDAचे नवे नियम
मुंढे यांनी स्पष्ट केलं की, 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळांसाठी आईचं दूधच सर्वोत्तम मानले जाते, त्यामुळे बेबी फूडच्या पॅकेजिंगपासून जाहिरांतीपर्यंत कोणत्याही प्रकारे आईच्या दुधाची तुलना ही किंवा त्याला पर्याय असल्याचा दावा करता कधीच येणार नाही. विशेष म्हणजे, बेबी फूडच्या पॅकेटवर आई आणि बाळाचा फोटो वापरण्यासही बंदी घालण्यात आलेली आहे.
FDA च्या तपासणीमध्ये सध्या बाजारातील काही बेबी फूड आणि फॉर्म्युला मिल्कच्या पॅकेटवर आईचं दूध हेची शिशुसाठी अतिशय सर्वोत्तम दूध आहे. ही कायदेशीर सूचना नसल्याचं आढळून आललं आहे. त्यासोबतच राज्यातील स्तनपानाचं प्रमाणही कमी होत असल्याचं मुंढे यांनी सांगितलं. सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळांना फक्त आईचं दूध देण्याचं प्रमाण हे 65 टक्क्यांवरुन 58 टक्क्यांवर आलंलं आहे. शहरी भागात हे प्रमाण 52 टक्के, तर ग्रामीण भागात पाहिलं तर हे प्रमाण 75 टक्के असल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे.
नव्या नियमांनुसार, बेबी फूडच्या पॅकेजवर आईचं दूध हे सर्वोत्तमच असल्याची सूचना ही ठळकपणे देणं बंधनकारक असेल. उत्पादनाचा वापर हा डॉक्टरांच्या सल्लानुसार करावा, हेसुद्धा नमूद करावं लागेल. शिवाय हे उत्पादन आईच्या दुधाला पर्याय नाही आणि सहा महिन्यांनंतरचा पूरक आहार आहे, असंही स्पष्टपणे छापावं लागणार आहे.
हेही वाचा-वाहनचालकांनो लक्ष द्या! थकीत ई-चलनाची रक्कम आता वीज बिलातून वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका
आता काय होणार?
एवढंच नाही तर कंपन्यांना आईच्या दुधाशी तुलना करणाऱ्या जाहिराती करता येणार नाही. शिवाय मोफत सॅम्पल किंवा कूपन वाटण्यासही मनाई असेल. डॉक्टर किंवा रुग्णालयांमार्फत अशा सर्व उत्पादनांचा प्रचारही करता येणार नाही. महत्त्वाचे म्हणजे या सर्व नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर तब्बल 3 ते 10 लाख रुपयांपर्यंत दंड आणि कारावासाची कारवाई होऊ शकते, असा इशार थेट FDA ने दिलेला आहे
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.