अमरावती: प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे आणि नुकतच त्यांनी सोमवारपासून पाणीत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच बच्चू कडू यांना आजही मुख्यमंत्र्यांचा फोन आला. फडणवीसांनी बच्चू कडू यांच्यासोबत फोनद्वारे संवाद साधला.
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांना आजही मुख्यमंत्र्यांनी फोन करुन आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. आम्ही कर्ज माफी नक्की करू, थोडा वेळ घ्या, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या प्रकरणी उच्चस्तरीय समिती लवकरच गठीत करण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. आज मंत्री उदय सामंत सरकारचा निरोप घेऊन बच्चू कडूंची भेट घेणार आहेत. मात्र, बच्चू कडू आंदोलनावर ठाम आहेत. तसेच मंत्री पंकजा मुंडेदेखील कडू यांची भेट घेणार आहेत.
हेही वाचा : नागपुरात लग्नाच्या जेवणातून नातेवाईकांना विषबाधा
बच्चू कडू यांना आजही मुख्यमंत्र्यांनी कॉल केला. आम्ही कर्ज माफी नक्की करू, थोडा वेळ घ्या,उच्चस्तरीय समिती लवकरच गठीत करण्यात येईल असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांना आजही कॉल करून उपोषण मागे घेण्यासाठी सांगितलं. मात्र बच्चू कडू आंदोलनावर ठाम आहेत. तसेच त्यांनी सोमवारपासून पाणीत्याग आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.
बच्चू कडूंच्या प्रमुख मागण्या काय?
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी
शेतमालाला एमएसपीवर (MSP) 20 टक्के अनुदान देण्यात यावे
दिव्यांग आणि विधवा महिलांना 6 हजार मानधन
शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांना समान निकष
मेंढपाळ - मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण
शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजूरांच्या अपघाती मृत्यु झाल्यास आर्थिक सहाय्य