सासऱ्यांना रुग्णालयात दाखल केलं अन् जावयाच्या घरी विपरीत घडलं; अख्खं गाव हादरलं

Beed Crime News : बीडच्या परळी शहरातील समतानगर परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

सासऱ्यांना रुग्णालयात दाखल केलं अन् जावयाच्या घरी विपरीत घडलं; अख्खं गाव हादरलं
Crime News

बीड : बीड जिल्ह्यातील परळी शहरात घरफोडीची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. शहरातील समता नगर या भागात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल सात तोळे सोने आणि दोन लाख रुपयांची रोकड असा एकून 4 लाख 77 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची माहिती आहे. या चोरी प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

घरातील सदस्य कुठे होते?
मिळालेल्या माहितीनुसार, समता नगर येथील वकील सायस रामराव मुंढे यांचे सासरे व्यंकटराव फड यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांना अंबाजोगाई येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यामुळे घरात कोणीही नसल्याने घर बंद होते. याच संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला आणि 16 ऑक्टोबर रोजी साधारण रात्री 9 वाजल्यापासून ते 17 ऑक्टोबर सकाळी साडेसहा वाजेपर्यंत घराचा कोंडा तोडूत आत प्रवशे केला. त्यानंतर या चोरट्यांनी कपाटचे लॉकर तोडत मौल्यवान वस्तू चोरून नेल्या.

हेही वाचा – मुलगा होईल म्हणून सांगितलं.. पण मुलगी झाली.. माथेफिरूंनी 75 वर्षीय पुजाऱ्याला गोळ्या झाडून संपवलं!

काय-काय चोरीला गेले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या झालेल्या चोरीत 2 लाख 2 हजार रुपयांची रोकड, मिनी गंठण, पट्टी गंठण, झुंबर, सरपाळे तसेत अंगठे असे 2 लाख 10 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि चांदीचे ताट, करंडा, जोडवे, दिवे असे साधारण 65 हजार रुपयांचे चांदीचे साहित्य ही चोरले, असे एकूण 4 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवण्यात आला आहे.वकील सायस मुंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी बीएनएस कायद्यानुसार गुन्हा नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टुवार पुढील तपास करत आहेत.

महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number