जय महाराष्ट्र न्यूज, बीड
बेटी बचाओ ,बेटी पाढाओ , हे ब्रीदवाक्य सांगणाऱ्या राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातच राज्यातील सर्वाधिक बालविवाह होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. बीड जिल्हाल्याची ओळख ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून राज्यात ओळख आहे.
त्याचप्रमाणे जिल्ह्यातील 3 लाख मजूर उसतोडणीसाठी बीड मधून स्थलांतर करीत असतात ऊस तोडणीसाठी पती-पत्नी अशी जोडी असती त्यामुळे घरातील मुला बाळांचा प्रश्न निर्माण होत असतो सहा महिने ऊसतोडणी साठी घराबाहेर जाणाऱ्या मजुरांच्या मुलींची यात मोठी संख्या आहे. वयात आलेली मुलगी घरी एकटी ठेवणे जोखमीचे असल्याने सातवी, आठवी, किंवा नववीत असणाऱ्या मुलींची लग्न होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.