मालाडमध्ये लाकडाच्या गोदामाला भीषण आग; परिसरात खळबळ, जीवितहानी…

मुंबईतील मालाड पश्चिम परिसरात आग लागल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री मुंबईतील मालाड पश्चिम येथील आनंद रोडवरील रुईया वुड वेअरहाऊसमध्ये सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे.

मालाडमध्ये लाकडाच्या गोदामाला भीषण आग; परिसरात खळबळ, जीवितहानी…
Malad news

मुंबईतील मालाड पश्चिम परिसरात आग लागल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री मुंबईतील मालाड पश्चिम येथील आनंद रोडवरील रुईया वुड वेअरहाऊसमध्ये सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. गोदामात मोठ्या प्रमाणात लाकडी फळ्या आणि कार्डबोर्डचा साठा असल्याने आगीने पेट घेतला.

हेही वाचा- शेतकरी संघटना आक्रमक; लोह्यात दोन फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांची तोडफोड!

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. रात्री 9 वाजता आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. रात्री 9 वाजून 13 मिनिटांनी अग्निशमन दलाकडून लेव्हल-1 फायर कॉल घोषित करण्यात आला. रुईया मॅरेज हॉल आणि वल्लभदास नागराज शाळेजवळ असलेल्या दोन मजली इमारतीच्या तळमजल्यावर हे गोदाम आहे.

लाकडाचे गोदाम असल्यामुळे गोदामात आग मोठ्या प्रमाणात पसरत गेली. यावेळी अग्निशमन दलासह पोलीस, मुंबई महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि संबंधित वॉर्डचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number