कुत्रा भुंकताच घराकडे धाव घेतली; गरम दुधाच्या दुर्घटनेत 3 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत; नेमकं घडलं काय?

Beed News : बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अवघ्या 3 वर्षीय दुर्गासोबत घडलेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. नेमकी घटना काय घडली? जाणून घ्या सविस्तर बातमी.

कुत्रा भुंकताच घराकडे धाव घेतली; गरम दुधाच्या दुर्घटनेत 3 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत; नेमकं घडलं काय?
Beed News

बीडच्या नांदूर हवेली या गावात एक धक्कादायक घटना घडलेली आहे. गरम दूध अंगावर पडून अवघ्या तीन वर्षीय चिमुकलीच्या मृत्यू झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकली घराच्या अंगणात खेळत होती. त्याच वेळी कुत्रा जोरात भुंकत तिच्या दिशेने आला. कुत्र्याला पाहून चिमुकलीने घराकडे धाव घेतली. पण घराच्या अंगणात चुलीवर दूध तापवण्यासाठी ठेवले होते. धावत असताना चिमुकलीचा तोल गेला आणि तिचा धक्का थेट दुधाच्या पातेल्याला लागला.

गरम दुधाने भरलेले पातेले हे थेट तिच्या अंगावर पडले. याच दुर्घटनेत चिमुकली गंभीर भाजली. कुटुंबियांनी तिला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र चिमुकलीच्या प्रकृती गंभीर असल्याने तिला त्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने नांदूर हवेली या गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number